JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Nawazuddin Siddiqui B'day: 'कधी वॉचमन तर कधी आचारी बनून चालवलं घर',आज इतक्या संपत्तीचा मालक आहे अभिनेता

Nawazuddin Siddiqui B'day: 'कधी वॉचमन तर कधी आचारी बनून चालवलं घर',आज इतक्या संपत्तीचा मालक आहे अभिनेता

Happy Birthday Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन नेहमीच चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्यासारखा भाव खाऊन जातो. हा हरहुन्नरी कलाकार आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्यांच्या नेटवर्थवर एक नजर टाकूया.

0108

नवाजुद्दीन सिद्दीकी हा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांना कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नाही आणि त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवला आहे.

जाहिरात
0208

नवाजुद्दीन नेहमीच चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्यासारखा भाव खाऊन जातो. हा हरहुन्नरी कलाकार आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्यांच्या नेटवर्थवर एक नजर टाकूया.

जाहिरात
0308

नवाजुद्दीन सिद्दीकी यांना जन्म 19 मे 1974 मध्ये मुज्जफरनगरमधील बुढाना या छोट्याशा गावात झाला होता. त्यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. सुरुवातीला त्यांनी रंगमंचावरून अभिनयाची सुरुवात केली होती.

जाहिरात
0408

त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता की त्यांना कधी वॉचमन तर कधी आचारी बनून आपला घरखर्च चालवावा लागला होता.

जाहिरात
0508

1999 मध्ये मुंबईत आल्यानंतर त्यांना आमिर खानच्या 'सरफरोश' या चित्रपटात एक अगदी छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. प्रचंड संघर्ष करून आज त्यांनी आपलं साम्राज्य उभं केलं आहे.

जाहिरात
0608

आज हा अभिनेता एका चित्रपटासाठी तब्बल 6 कोटी इतकं मानधन घेतो. अलीकडे त्याने आपल्या मानधनात 24 टक्के वाढ केल्याचं सांगितलं जातं.

जाहिरात
0708

याशिवाय विविध प्रॉडक्टसच्या जाहिरातींमधून हा अभिनेता कोट्यावधी रुपयांची कमाई करतो.एका ब्रँडसाठी ते 1 कोटी रुपये घेतात. नुकतंच त्यांनी आपल्या गावी आलिशान घरसुद्धा घेतलं आहे. त्यांच्या घराची किंमत 17 कोटी असल्याचं म्हटलं जातं.

जाहिरात
0808

शिवाय त्यांच्याजवळ मर्सिडीज बेन्ज, ऑडी, बीएमडब्ल्यू अशा अनेक लक्झरी कार आहेत. आज नवाजुद्दीन यांच्याजवळ तब्बल 96 कोटींची संपत्ती आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या