बॉलिवूड मधील अभिनेत्रीसाठी फिटनेस किती महत्वाचा असतो आपल्या सगळ्यांनाचं माहिती आहे. मात्र प्रेग्नेन्सीमध्ये फिटनेस ठेवणं खूप कठीण असत. मात्र बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी प्रेग्नेंसीमध्ये सुद्धा आपल्या कामाशी निष्ठा राखली आहे. आज ‘मदर्स डे’ निमित्त अशाच काही अभिनेत्रींबद्दल आपण पाहणार आहोत.
बॉलिवूड मधील अभिनेत्रीसाठी फिटनेस किती महत्वाचा असतो आपल्या सगळ्यांनाचं माहिती आहे. मात्र प्रेग्नेन्सीमध्ये फिटनेस ठेवणं खूप कठीण असत. मात्र बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी प्रेग्नेंसीमध्ये सुद्धा आपल्या कामाशी निष्ठा राखली आहे. आज 'मदर्स डे' निमित्त अशाच काही अभिनेत्रींबद्दल आपण पाहणार आहोत.
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी जेव्हा पहिल्यांदा गर्भवती होत्या, तेव्हा त्या 'रजिया सुलतान' या चित्रपटाचं शुटींग करत होत्या. यावेळी त्यांनी कडक उन्हात वाळवंटात शुटींग केल होतं.
अभिनेत्री श्रीदेवी या 1997 मध्ये गर्भवती होत्या, त्यावेळी त्या 'जुदाई' या चित्रपटाचं शुटींग करत होत्या. मात्र त्यांनी आपल्या कामात व्यत्यय न आणता आपलं शुटींग पूर्ण केल होतं. शुटींग नंतर त्यांनी जान्हवीला जन्म दिला होता.
अभिनेत्री जया बच्चन या सुपरहिट चित्रपट 'शोले' मध्ये काम करत असताना 3 महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यानंतर त्यांनी मुलगी श्वेताला जन्म दिला होता.
अभिनेत्री जुही चावला यांनी उद्योगपती जय मेहता सोबत लग्नं केल आहे. 'आमदनी आठ्नी खर्चा रुपय्या' या चित्रपटाच्यावेळी त्या पहिल्यांदा गर्भवती होत्या. त्यांनतर ;झंकार बीट्स' या चित्रपटाच्या शुटींग वेळी त्या आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार होत्या
1999 मध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी डॉक्टर असणाऱ्या श्रीराम नेने सोबत लग्नं केलं होतं. त्यांनतर सन 2000 'देवदास' चित्रपटाच्या शुटींगवेळी त्या गर्भवती होत्या. मात्र तरीसुद्धा त्यांनी उत्तम नृत्य सादर केलं आहे.
'वी आर फेमिली' चित्रपटाच्या शुटींगदरम्यान काजोल आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार होती. मात्र गर्भवती असून देखील तिनं चित्रपटाचं शुटींग पूर्ण केल आणि प्रमोशनदेखील केल होतं.
अभिनेत्री करीना कपूरने सुद्धा गर्भवती असताना चित्रपटाचंही शुटींग केलं आहे. आणि जाहिरातींमध्ये सुद्धा काम केल आहे.