मुंबई, 26 ऑगस्ट : गायक सिद्धू मूसेवाला आता या जगात नाही. मात्र आजही तो त्याच्या कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. सिद्धूचे जुने व्हिडिओ आणि फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच सिद्धू मूसेवालाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. सिद्धूचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याविषयी गायक सलीम मर्चंट यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सलीम मर्टंनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सिद्धू मुसेवालाच्या आगामी गाण्याविषयी सांगितलं आहे. सिद्धूचे नवीन गाणे ‘जनदी वार’ हे गाणे 2 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होत आहे. हे गाणे सिद्धूने गेल्या वर्षी अफसाना खानसोबत रेकॉर्ड केले होते. या गाण्यातून जो काही कमाई होईल, त्याचा काही भाग त्याच्या वडिलांना आणि आईला दिला जाईल. हेही वाचा - Raju Srivastava: शुद्धीवर येताच सर्वप्रथम ‘या’ व्यक्तीशी बोलले राजू श्रीवास्तव; म्हटले ‘हे’ चार शब्द सलीम मर्चंटनं म्हटलं की, ‘अनेक लोक मला हा प्रश्न विचारतात की, सिद्धू मूसवालासोबत तू केलेले गाणे कधी रिलीज होणार आहे? त्यामुळे आता ती वेळ आली आहे. आम्ही हे गाणे गेल्या वर्षी जुलै 2021 मध्ये चंदीगडमध्ये रेकॉर्ड केले होते. गेल्या वर्षी मी अफसाना खानला भेटलो आणि तिने माझी सिद्धूशी ओळख करून दिली’. या व्हिडिओमध्ये सिद्धू मुसेवालाचीही काही झलक आहे. तो सलीम आणि अफसानाला भेटून टीमशी चर्चा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते भावूक झाले आहेत.
सलीमने पुढे म्हटलं की, ‘आज सिद्धू आमच्यात नाही, पण त्याचा आवाज, त्याची विचारसरणी या गाण्यात आहे. आणि म्हणूनच श्रद्धांजली म्हणून आम्ही हे गाणे रिलीज करत आहोत. सिद्धूच्या चाहत्यांसाठी, सिद्धूवर प्रेम करणाऱ्यांसाठी आणि सिद्धूची गाणी आवडणाऱ्या भारतातील आणि परदेशातील सर्व लोकांसाठी’.