JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Gauri Khan B’day Spl: 1600 कोटींची मालकीण आहे किंग खानची पत्नी, जाणून घ्या गौरीविषयी...

Gauri Khan B’day Spl: 1600 कोटींची मालकीण आहे किंग खानची पत्नी, जाणून घ्या गौरीविषयी...

Gauri Khan Birthday Special: अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा आज वाढदिवस आहे. मुलगा आर्यन खान एनसीबीच्या (Aryan Khan NCB Case) कोठडीत आहे. त्यामुळं यावर्षी गौरीच्या वाढदिवसावर नैराश्याचं सावट आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 ऑक्टोबर: शाहरुख खान (Shah Rukh Khan Latest News Update) आणि गौरी खान (Gauri Khan Birthday Special) हे बॉलिवूडमधील आयकॉनिक जोडप्यांपैकी एक मानलं जातं. गौरीनं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फिल्म कॉरिडॉरमधील गौरीचं फ्रेंड सर्कलही खूप चांगलं आणि मोठं आहे. 2018 मध्ये फॉर्च्युन इंडिया मॅगझिनच्या (Fortune India Magazine) 50 प्रभावशाली महिलांच्या यादीत गौरीला स्थान मिळालं होतं. आज 8 ऑक्टोबर गौरी खानचा वाढदिवस आहे. सध्या बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानचं कुटुंब कठीण काळातून जात आहे. त्याचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या (Aryan Khan NCB Case) कोठडीत आहे. त्यामुळं यावर्षी गौरीच्या वाढदिवसावर नैराश्याचं सावट आहे. वाढदिवसानिमित्त गौरीच्या व्यावसायिक कारकिर्दीवर एक नजर टाकूया. राजधानी दिल्लीमध्ये, 8 ऑक्टोबर 1970 रोजी गौरीचा जन्म झाला. पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या गौरीनं दिल्लीतील नावाजलेल्या शाळा-कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे. तिच्याकडं दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिष्ठित लेडी श्री राम कॉलेजची पदवी आहे. अभिनेता शाहरुखच्या कारकिर्दीचा आलेख उंचावण्यासाठी गौरीनं त्याला कायम साथ दिली आहे. कित्येक मुलाखतींमध्ये शाहरुखनं हे मान्य देखील केलेलं आहे. मुलांच्या संगोपनाबरोबरच तिनं आपलं करिअरही घडवलं. गौरी खान एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे

गौरी खान एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे

गौरी खान एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. त्यांचा ‘मन्नत’ बंगल्याचं इंटिरियर डिझाइन गौरीनेच केलं आहे. याशिवाय तिनं इतर देखील बॉलिवूड कलाकारांच्या घरांचं इंटेरियर डिझायनिंग केलं आहे. मुंबईच्या जुहू या पॉश भागात तिचं स्वतःचं एक फ्लॅगशिप स्टोअर आहे. त्या ठिकाणी रॉबर्टो कॅवल्ली आणि रॉल्फ लॉरेन सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे होमवेअर अॅक्सेंट उपलब्ध आहेत. याशिवाय, ती रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसची (Red Chillies Production House) सह-संस्थापक देखील आहे. गौरीच्या होम प्रॉडक्शन बॅनरखाली ‘मैं हूँ ना’, ‘ओम शांती ओम’, ‘माय नेम इज खान’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ असे अनेक सुपरहिट चित्रपट तयार झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, गौरीनं आपल्या विविध व्यवसायांच्या माध्यमातून सुमारे 1 हजार 600 कोटी रुपयांची संपत्ती कमवलेली आहे. गौरी रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसची सह-संस्थापक आहे

गौरी रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसची सह-संस्थापक आहे

8 वर्षांच्या दीर्घ प्रेमप्रकरणानंतर 1991 मध्ये शाहरुख आणि गौरीनं लग्न केलं होतं. त्यांना आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत. लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही गौरीनं शाहरुखला खंबीर साथ दिली आहे. तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि तिचं करिअर असंच बहरत राहो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या