JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / गेले ते क्षण राहिल्या त्या आठवणी; ही चिमुरडी आज आहे गुगलवर सर्वाधिक सर्च होणारी अभिनेत्री

गेले ते क्षण राहिल्या त्या आठवणी; ही चिमुरडी आज आहे गुगलवर सर्वाधिक सर्च होणारी अभिनेत्री

ओळखा पाहू ही अभिनेत्री आहे कोण? गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे ही तरुणी….

0110

गरीमा जैन ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिनं शेअर केलले फोटो आणि व्हिडीओज कायमच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. (Garima Jain/Instagram)

जाहिरात
0210

यावेळी देखील गरीमानं असेच काही लक्षवेधी फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Garima Jain/Instagram)

जाहिरात
0310

मात्र हे तिच्या बालपणीचे फोटो आहेत. या फोटोंद्वारे गरीमानं आपल्या बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा नव्यानं उजाळा दिला आहे. (Garima Jain/Instagram)

जाहिरात
0410

वेब सीरिजमध्ये बोल्ड अवतारात झळकणारी ही अभिनेत्री या निरागस फोटोंमध्ये अगदी गोंडस दिसत आहे. ‘गेले ते क्षण राहिल्या त्या आठवणी’ अशा आशयाची पोस्ट शेअर करत तिनं आपल्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. (Garima Jain/Instagram)

जाहिरात
0510

फेना डिटर्जेंट पावडच्या जाहिरातीमधून तिने टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले होते. 'महाभारत' या मालिकेमुळे गरिमा पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. या मालिकेत तिने 'दुशाला' ही व्यक्तिरेखा साकारली होती. (Garima Jain/Instagram)

जाहिरात
0610

यानंतर तिनं 'शक्ति - अस्तित्व के एहसास की' आणि 'हिवडे मे फुटे लड्डू' या मालिकांमध्ये काम केलं. परंतु या दोन्ही मालिका काही खास कमाल करु शकल्या नाहीत. (Garima Jain/Instagram)

जाहिरात
0710

टीआरपीच्या कमतरतेमुळे लवकरच या मालिका बंद करण्यात आल्या. त्यानंतर तिने 'ये है मोहब्बतें', 'कवच...काली शक्तियों से', 'भगवत पुराण' यांसारख्या मालिकांमध्ये काही लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. (Garima Jain/Instagram)

जाहिरात
0810

गरिमाला खरी लोकप्रियता मिळाली ती 'गंदी बात' या वेब सिरीजमुळे. 'गंदी बात'चा चौथा सिझन गरिमाच्या हॉट सीन्समुळे प्रचंड चर्चेत होता. (Garima Jain/Instagram)

जाहिरात
0910

या वेब सीरिजमुळे तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. सोशल मीडियावर 20 लाखांपेक्षा अधिक नेटकरी तिला फॉलो करु लागले. (Garima Jain/Instagram)

जाहिरात
1010

सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ती ओळखली जाते. 'गंदी बात' या वेब सीरिजनंतर गरिमाला गुगलवर पहिल्या 20 दिवसांत तब्बल दोन कोटी वेळा सर्च करण्यात आले होते. (Garima Jain/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या