Weight Loss Journey: ‘परवरिश’ या टीव्ही मालिकेतील श्वेता तिवारीची मुलगी तुम्हाला आठवत असेलच? ती अभिनेत्री आहे आशिका भाटिया.
'परवरिश' या टीव्ही मालिकेतील श्वेता तिवारीची मुलगी तुम्हाला आठवत असेलच? ती अभिनेत्री आहे आशिका भाटिया.
मात्र गेल्या काही वर्षांपासून आशिका भाटियाचं वजन प्रचंड वाढलं होतं. दरम्यान आता अभिनेत्रीने आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांनाच थक्क केलं आहे.
वास्तविक, 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटात दिसल्यानंतर काही दिवसांतच अभिनेत्रीचा मोठा अपघात झाला होता.
तिच्यावर गुडघ्याची मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांनतर अभिनेत्री बरेच महिने बेडरेस्टवर होती.
अशात तिचं वजन प्रचंड वाढलं होतं. मात्र तरीसुद्धा ती न लाजता सोशल मीडियावर आपले विविध व्हिडीओ शेअर करत असे.
मात्र अभिनेत्रीने जिद्द न सोडता स्वतः मध्ये इतका बदल केला, की तिची वेट लॉस जर्नी पाहून सर्वच थक्क आले आहेत. आशिकाच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.