JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'मी दररोज 40 पुशअप्स काढेन' परंतु.. नेटकऱ्याने फिटनेस फ्रिक मिलिंद सोमणला दिलं भलतंच चॅलेंज

'मी दररोज 40 पुशअप्स काढेन' परंतु.. नेटकऱ्याने फिटनेस फ्रिक मिलिंद सोमणला दिलं भलतंच चॅलेंज

अभिनेते मिलिंद सोमण वयाच्या पन्नाशीनंतरसुद्धा तितकेच फिट अँड हँडसम आहेत. त्यांचा फिटनेस पाहून तरुणसुद्धा थक्क होतात.

0108

अभिनेते मिलिंद सोमण वयाच्या पन्नाशीनंतरसुद्धा तितकेच फिट अँड हँडसम आहेत. त्यांचा फिटनेस पाहून तरुणसुद्धा थक्क होतात. परंतु यासाठी ते अतिशय मेहनत घेतात. त्यांना असं वाटतं सर्वांनीच जगण्यासाठी हा कानमंत्र अवलंबला पाहिजे.

जाहिरात
0208

नुकतंच मिलिंद सोमण यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या या पोस्टची चर्चा सर्वत्र होत आहे. यामध्ये त्यांनी काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत.

जाहिरात
0308

मिलिंद सोमण यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये काही मुले पुशअप्स करताना दिसून येत आहेत. खरं तर हे त्यांचे चाहते आहेत.

जाहिरात
0408

मिलिंद सोमण यांनी पोस्ट लिहीत सांगितलं आहे, 'आळशी लढा, सेल्फी युगा साठी. मिलिंद यांनी म्हटलं आहे. माझा अनेक वर्षांपासून नियम आहे जो मुलगी पुशअप्स करत नाही मी त्याच्यासोबत सेल्फी घेत नाही.

जाहिरात
0508

मुलासाठी 20 पुशअप्स आणि मुलींसाठी 10 असा माझा नियम आहे. माझा मूळ उद्देश त्यांना सेल्फी काढण्यापासून परावृत करणे हाच होता. परंतु विशेष म्हणजे हे सर्वजण आनंदाने पुशअप्सचं चॅलेंज घेत आहेत.

जाहिरात
0608

वयाच्या 80 व्या वर्षी जर हे चॅलेंज माझी आई पूर्ण करू शकत असेल तर ते कोणासाठीही सहज शक्य आहे, असं मला वाटतं.

जाहिरात
0708

जेव्हा तुम्ही हे करून पाहता तेव्हाच तुमच्या लक्षात येतं की हे तुम्ही करू शकता. त्यातून तुम्हाला आणखी चांगलं करण्याची ऊर्जा मिळते.एका नेटकऱ्याने त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे , मी दररोज 40 पुशअप्स काढेन परंतु तुम्ही आमच्या चिपळूणजवळील ४३ एकर शेताला भेट द्यायला हवी.

जाहिरात
0808

गर्भवती महिला, दुखापत झालेली व्यक्ती आणि घातलेली मुले यांच्यासाठी हा फिटनेस नियम अपवाद आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या