JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: लग्नानंतर डिनर पार्टीसाठी जोया अख्तरच्या घरी पोहोचले फरहान-शिबानी, जोडप्याचा वेडिंग ग्लो पाहून चाहते प्रेमात

VIDEO: लग्नानंतर डिनर पार्टीसाठी जोया अख्तरच्या घरी पोहोचले फरहान-शिबानी, जोडप्याचा वेडिंग ग्लो पाहून चाहते प्रेमात

लग्नानंतर दोन दिवसांनी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) मीडियासमोर दिसले. आता हे जोडपे जोया अख्तरच्या (Zoya Akhtar) घरी संपूर्ण फॅमिली आणि जवळच्या मित्रांसोबत डिनर पार्टीसाठी (Denner Party) एकत्र आले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,22 फेब्रुवारी-   लग्नानंतर दोन दिवसांनी बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता फरहान अख्तर  (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर   (Shibani Dandekar)  मीडियासमोर दिसले. आता हे जोडपे जोया अख्तरच्या  (Zoya Akhtar)  घरी संपूर्ण फॅमिली आणि जवळच्या मित्रांसोबत डिनर पार्टीसाठी  (Denner Party)  एकत्र आले होते. 19 फेब्रुवारीला खंडाळा येथील फार्महाउसवर फरहान आणि शिबानी लग्नाच्याबेडीत अडकले आहेत. या लग्नाची गेली अनेक दिवस सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. फरहान अख्तरची बहीण जोया अख्तरने फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईतील आपल्या वांद्रे येथील घरी डिनर पार्टीचे आयोजन केले होते.या जोडप्याच्या डिनर पार्टीला शिबानीची बहीण अनुषा दांडेकर व्यतिरिक्त तिच्या जवळच्या मित्रांनीही हजेरी लावली होती.यावेळी शिबानी दांडेकरने निळ्या अंगाचा वेस्टर्न गाऊन परिधान केला होता. तर दुसरीकडे फरहान काळ्या रंगाच्या पॅन्ट शर्टमध्ये दिसून आला. यावेळी अनुषा दांडेकरने एक पांढऱ्या रंगाचा वेस्टर्न जम्प सूट परिधान केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून फरहान अख्तरआणि शिबानी दांडेकरचा विवाहसोहळा चर्चेत होता. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी आपले लग्न जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर पार पाडले. दोघांनीही आपले लग्न अगदी साधेपणाने करायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी ते पूर्णपणे खाजगी ठेवले. या लग्नाला केवळ 50 लोक उपस्थित होते.लग्नाआधी दोघांनी जवळपास 4 वर्षे एकमेकांना डेट केले होते.

संबंधित बातम्या

फरहान अख्तरचा खास मित्र आणि बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याचे आई-वडील राकेश रोशन आणि पिंकी रोशन यांनीही लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी शिबानी पारंपरिक लेहेंगा किंवा साडी परिधान न करता लाल आणि तपकिरी रंगाच्या गाऊनमध्ये फारच सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे फरहान काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसून आला होता. माध्यमांशी संवाद साधताना फरहान आणि शिबानीने सर्वांना लग्नासाठी मिठाई भेट दिली. तसेच त्यांच्यासोबत आपला आनंदही शेअर केला.फरहानच्या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.  \ज्यामध्ये तो हृतिक रोशनसोबत त्याच्या चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या