JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Farhan Akhtar Wedding: फरहान अख्तर-शिबानी दांडेकर मराठमोळ्या पद्धतीने करणार लग्न, याठिकाणी पार पडणार विवाहसोहळा

Farhan Akhtar Wedding: फरहान अख्तर-शिबानी दांडेकर मराठमोळ्या पद्धतीने करणार लग्न, याठिकाणी पार पडणार विवाहसोहळा

Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding: फरहान अख्तरचे चाहते त्याच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत. या जोडप्याच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून मीडियात चर्चेत होत्या. परंतु आता अशी माहिती येत आहे की हे जोडपं मराठी पद्धतीनं लग्नगाठ बांधणार आहे.

जाहिरात

Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 फेब्रुवारी-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता फरहान अख्तर   (Farhan Akhtar)  आणि शिबानी दांडेकर  (Shibani Dandekar)   21 फेब्रुवारीला लग्नबंधनात   (Wedding)  अडकणार असल्याचं सांगितलं जात होतं. फरहान अख्तरचे चाहते त्याच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत. या जोडप्याच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून मीडियात चर्चेत होत्या. परंतु आता अशी माहिती येत आहे की हे जोडपं मराठी पद्धतीनं लग्नगाठ बांधणार आहे. हे दोघे 19 फेब्रुवारीला लग्न करू शकतात. यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रांचा समावेश असेल असं म्हटलं जात आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, हा एक अतिशय खाजगी लग्नसोहळा असेल. हे लग्न शनिवारी फरहान अख्तरच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर होणार आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांना हे लग्न अत्यंत गुप्त ठेवायचं आहे. कोणत्याही मीडियाला या ठिकाणाची माहिती मिळावी असं कुटुंबीयांना वाटत नाही. लग्नासाठी केवळ कुटुंबातील सदस्यांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे. प्रत्येक माहिती गोपनीय ठेवली जात असली तरी मराठी चालीरितींनुसार दोघं लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचं कुटुंब 18 फेब्रुवारीला कार्यक्रमस्थळी जाणार आहे. लग्न रात्री ऐवजी दिवसा होण्याची शक्यता जास्त आहे. यात शिबानी दांडेकरची बहीण आणि काही खास मैत्रिणींचाही समावेश असेल. प्री-वेडिंग फंक्शनमध्ये ती स्वतः बॅचलर पार्टीची योजना बघत आहे. शिबानी आणि फरहान दोघेही गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लग्नानंतर दोघेही मित्र आणि सहकाऱ्यांसाठी रिसेप्शन ठेवू शकतात. काही दिवसांपूर्वी फरहान अख्तरने त्याच्या मित्रांचा एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये शिबानी दांडेकरही होती. एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लग्न करणार असल्याच्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केला होता. त्यांनी म्हटलं होतं, ‘होय, लग्न होत आहे. वेडिंग प्लानर लग्नाची तयारी करत आहेत’. शिबानी आणि फरहान सतत एकेमकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. या दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची मोठी प्रतीक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या