Farhan-Shibani Dandekar Wedding:फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे.आज, 17 फेब्रुवारीला शिबानी आणि फरहानची हळद आहे. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत.
Farhan-Shibani Dandekar Wedding: फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात देखील झाली आहे. या दोघांनी मात्र यावर मौन बाळगलं आहे. आज, 17 फेब्रुवारीला शिबानी आणि फरहानची हळद आहे. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. (फोटो साभारः Viral Bhayani)
हे फोटो फरहान अख्तरच्या घरातील आहेत. यावेळी शिबानी दांडेकर आणि अनुषा दांडेकर दिसल्या. (फोटो साभारः Viral Bhayani)
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचे लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीनं होणार आहे. (फोटो साभारः Viral Bhayani)
18 फेब्रुवारीला संगीत सोहळा फरहान अख्तरच्या खंडाळ्याच्या बंगल्यात होणार आहे. (फोटो साभारः Viral Bhayani)
फरहान अख्तरच्या हळदी समारंभावेळी शबाना आझमी देखील पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसल्या. (फोटो साभारः Viral Bhayani)
फरहान-शिबानीच्या हळदी समारंभाला अमृता अरोराने देखील हजेरी लावली होती. (फोटो साभारः Viral Bhayani)