JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / फरहान अख्तर-शिबानी दांडेकर यांच्या पहिल्या भेटीपासून लग्नापर्यंत,अशी आहे दोघांची LOVESTORY

फरहान अख्तर-शिबानी दांडेकर यांच्या पहिल्या भेटीपासून लग्नापर्यंत,अशी आहे दोघांची LOVESTORY

Farhan-Shibani Love Story: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 19 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याचबरोबर आता फरहान आणि शिबानीच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांनाही सुरुवात झाली आहे.

0108

Farhan-Shibani Love Story: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 19 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याचबरोबर आता फरहान आणि शिबानीच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांनाही सुरुवात झाली आहे. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाह खंडाळा येथे 19 फेब्रुवारी रोजी मराठमोळ्या पद्धतीने होणार असल्याची बातमी आहे. तसेच या दोघांची लव्हस्टोरीही बरीच फिल्मी आहे. दोघांनी जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केलं आहे. त्यानंतर आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
0208

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरहान आणि शिबानीची पहिली भेट 'आय कॅन डू दॅट' या रिअॅलिटी शोच्या सेटवर झाली होती.

जाहिरात
0308

त्यावेळी फरहान हा शो होस्ट करत होता आणि शिबानी या शोची स्पर्धक होती. अशाप्रकारे फरहान आणि शिबानीला एकत्र करण्यात या शोचा मोठा वाटा आहे असंच म्हणावं लागेल.

जाहिरात
0408

आजतकच्या रिपोर्टनुसार, या रिएलिटी शोच्या शूटिंगदरम्यान फरहान आणि शिबानी एकमेकांच्या जवळ आले होते.

जाहिरात
0508

याच शोदरम्यान फरहान आणि शिबानी यांच्या अफेअरच्या बातम्याही समोर आल्या होत्या. दरम्यान शिबानीने एक फोटो शेअर केला होता. जो त्याचवेळी फरहाननेही पोस्ट केला होता. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चांनाही उधाण आले होते.

जाहिरात
0608

फरहान आणि शिबानी हे दोघेही 2018 मध्ये पहिल्यांदा एकत्र दिसले होते. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हे जोडपे एकत्र दिसले होते. तेव्हापासून फरहान आणि शिबानीने कधीही आपले नाते लपवले नाही.

जाहिरात
0708

2018 नंतर फरहान आणि शिबानीचे अनेक फोटो समोर आले होते. त्यांनतर दोघे अनेकदा खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त करताना दिसले.

जाहिरात
0808

2017 मध्ये फरहानने त्याची पहिली पत्नी अधुना भाबानीपासून घटस्फोट घेतला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या