JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: बॉलिवूड पदार्पणापूर्वीच Shehnaaz Gill वर नाराज झाले चाहते, काय आहे कारण?

VIDEO: बॉलिवूड पदार्पणापूर्वीच Shehnaaz Gill वर नाराज झाले चाहते, काय आहे कारण?

शहनाज गिल नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली असून तिच्या कृतीमुळे चाहते नाराज झालं असल्याचं दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 सप्टेंबर: ‘बिग बॉस 13’ मुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल. अगदी कमी कालावधीत शहनाजनं सगळ्यांची मनं जिंकली. बिग बॉसमधून बाहेर आल्यापासून शहनाज सतत चर्चेत असते. अशातच शहनाज नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली असून तिच्या कृतीमुळे चाहते नाराज झालं असल्याचं दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय. शहनाजचा नवा व्हिडिओ समोर आल्यापासून सोशल मीडियावर लोक तिला ट्रोल करत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शहनाज सेटवरून तिच्या व्हॅनकडे जाताना दिसत आहे. यादरम्यान पापाराझी तिला कशी आहे विचारतात. यावर ती म्हणते मी आत्ता बिझी आहे, मी कामात आहे. पुढे शहनाज म्हणाली की, ‘मी बरी नसले तरी तुम्ही औषध देणार आहात का?’. तिच्या या उद्धटपणामुळे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत.

संबंधित बातम्या

‘लूक अॅटिट्यूड, पहिला अॅटिट्यूड नव्हता आता बॉलिवूडमध्ये आल्यावर लगेच अॅटिट्यूड आला, बकवास, व्हेरी रुड, किती बदलली आहे’, अशा अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडीओवर येताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून शहनाजला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. हेही वाचा -  Actress Mahalakshmi: अभिनेत्री महालक्ष्मी आहे तरी कोण? प्रोड्युसरशी लग्न करुन आलीये चर्चेत दरम्यान, शहनाज गिल सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात ती सलमान खानसोबत दिसणार आहे. यापूर्वी चित्रपटाचे नाव ‘कभी ईद कभी दिवाळी था’ असं होतं. तिचे चाहते तिच्या बॉलिबूड पदार्पणासाठी खूप उत्सूक आहेत. त्यामुळे शहनाज तिच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकेल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या