आज राम चरणचा वाढदिवस आहे. 36 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
राम चरण हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. येवडू, मगदिरा, ऑरेंज, ध्रुवा, नायक यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे.
जबरदस्त अॅक्शन आणि अफलातून अभिनय शैलीसाठी प्रसिद्ध असलेला राम जवळपास एक दशक सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
आज राम चरणचा वाढदिवस आहे. 36 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान काही चाहत्यांनी तर केवळ रामला वाढदिवसाच्या शुभेच्छा देता याव्यात यासाठी तब्बल 231 किलोमीटरचं अंतर पायी कापलं. आश्चर्याची बाब म्हणजे या चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याचं दर्शन घेण्यासाठी चार दिवस पायी प्रवास केला.
रामने देखील या चाहत्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केलं. त्यांची गळाभेट घेऊन विचारपूस केली. त्यांच्यासोबत जेवण देखील केलं. या अविस्मरणीय क्षणाचे फोटो त्यानं सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत.