आजही हिंदी सिनेमात अशी कोणतीच व्यक्ती किंवा कलाकार नसेल ज्याला यशराज बॅनरसोबत काम करायची इच्छा नाही.
बॉलिवूडचे सर्वात मोठे शोमॅन राज कपूर यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 14 डिसेंबर 1924ला पेशावर (सध्याचं पाकिस्तान)मध्ये झाला होता. वडील पृथ्वीराज कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिनय क्षेत्रात आलेल्या राज कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टी एकपेक्षा एक हिट सिनेमे देत इतिहास रचला.
11 डिसेंबर 1922 मध्ये सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर येथे जन्मलेले दिलीप कुमार सध्या सिनेसृष्टीपासून दूर असले तरी एकेकाळी याच बॉलिवूडवर त्यांनी एकहाती राज्य केलं होतं. त्यामुळे आजही त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांचं खरं नाव मोहम्मद युसूफ खान असं आहे.
अविभाजित भारताच्या झेलम जिल्ह्यात 18 ऑगस्ट 1934 जन्मलेले गुलजार यांनीही अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ज्या जिल्ह्यात गुलजार यांचा जन्म झाला तो भाग आता पाकिस्तानमध्ये येतो. कमी वयात लेखनाला सुरुवात करणाऱ्या गुलजार यांचे आजही असंख्य चाहते आहे.
भारतीय सिनेमांची ‘जान’ असं ज्यांना म्हटलं जात त्या सुनील दत्त यांचा जन्म खुर्दी, पंजाब गावात 6 जून 1929 मध्ये झाला. हा भागही आता पाकिस्तानमध्ये येतो. सुनील दत्त याचं खरं नाव बलराज रघुनाथ दत्त असं आहे. ते एक असे अभिनेता होते ज्यांनी सामान्य भारतीय व्यक्ती मोठ्या पडद्यावर साकारला.
27 डिसेंबर 1932ला लाहोरमध्ये जन्मलेले यश राज चोप्रा फाळणीनंतर काही काळानं मोठा भाऊ बलदेव राज चोप्रासोबत मुंबईला आले. यशराज यांनी बॉलिवूडमध्ये बरंच नाव कमावलं. आजही हिंदी सिनेमात अशी कोणतीच व्यक्ती किंवा कलाकार नसेल ज्याला यशराज बॅनरसोबत काम करायची इच्छा नाही.