JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Bigg Boss 15 मध्ये 'अंगूरी भाभी' चा असणार समावेश? शुभांगी अत्रे ने केला खुलासा

Bigg Boss 15 मध्ये 'अंगूरी भाभी' चा असणार समावेश? शुभांगी अत्रे ने केला खुलासा

‘भाभीजी घरपर है’ या मालिकेमुळे शुभांगी अत्रे घराघरात पोहोचली आहे.

0108

'भाभीजी घरपर है' ही विनोदी मालिका खुपचं लोकप्रिय आहे. तसेच या मालिकेतील प्रत्येक पात्र खुपचं प्रसिद्ध आहे. त्यातीलचं एक म्हणजे अंगुरी भाभी होय. हे पात्र अभिनेत्री शुभांगी अत्रे साकारत आहे. शुभांगीला 'बिग बॉस 15' चं निमंत्रण मिळाल्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

जाहिरात
0208

अंगुरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रेला बिग बॉस 15 साठी विचारणा झाल्याचं म्हटलं जात आहे. आत्ता बिग बॉसमध्ये का सहभागी होऊ शकत नाही याबद्दल शुभांगीने खुलासा केला आहे.

जाहिरात
0308

शुभांगीने एका मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे, मला स्वतः सलमान सरांसोबत स्क्रीन शेयर करायची आहे. यामध्ये काही खोटं नाहीय. मात्र आपल्या मालिकेची जबबदारीसुद्धा मला माहिती आहे.

जाहिरात
0408

शुभांगीने म्हटलं आहे, मला माझ्या चाहत्यांना नाराज नाही करायचं. त्यामुळे मी ही मालिका सोडू शकत नाही. आणि म्हणूनच मी त्या घरामध्ये कैद होण्यास तयार नाहीय.

जाहिरात
0508

तसेच तिनं म्हटलं आहे, यावर्षीच नव्हे तर प्रत्येक वर्षी मला या शोमध्ये सहभागी होण्यासाठी विचारलं जातं. म्हणूनच मला आत्ता हा शो बघण्यात रस निर्माण झाला आहे.

जाहिरात
0608

शुभांगीने म्हटलं आहे, मी हा शो फॉलो करते. मात्र याचा अर्थ असा नाही की मी यामध्ये सहभागी होणार आहे.

जाहिरात
0708

तसेच ती म्हणते, या शोमध्ये एक स्पर्धक म्हणून कसं वाटत मला नाही माहिती, पण माझं मन खुपचं हळव आहे. जेव्हा या घरात कारण नसतानासुद्धा भांडण होतं ते पाहून मला नैराश्य आल्यासारखं वाटतं. कारण मी असं नाही करू शकत. मात्र मोकळ्या वेळेत मी हा शो बघते.

जाहिरात
0808

लहानपणापासून अभिनेत्री व्हायचं स्वप्न असणाऱ्या शुभांगीच हे स्वप्न लग्नानंतर पूर्ण झालं होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या