आज ‘इंजिनिअर डे’ साजरा केला जात आहे. बॉलिवूडमध्येसुद्धा असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी इंजिनिअरची डिग्री मिळवली आहे. मात्र नंतर त्यांनी अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला होता
आज 'इंजिनिअर डे' साजरा केला जात आहे. बॉलिवूडमध्येसुद्धा असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी इंजिनिअरची डिग्री मिळवली आहे. मात्र नंतर त्यांनी अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला होता. पाहा कोण आहेत हे कलाकार.
अभिनेत्री क्रिती सेननने इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक केलं आहे. तिने दिल्लीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. मात्र नंतर ती चित्रपटांकडे वळली.
अभिनेता कार्तिक आर्यननेसुद्धा मुंबईमध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे. मात्र अभिनयाची आवड असल्याने त्याने घरी न सांगताच अभिनयाची सुरुवात केली होती.
'उरी' फेम अभिनेता विकी कौशलने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कम्युनिकेशन मधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.
अभिनेता सोनू सूदने यशवंतराव चव्हाण कॉलेज नागपूरमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.