JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / हे 'Outsiders' करणार बॉलीवूड मध्ये धमाकेदार एन्ट्री, प्रसिद्धीच्या जोरावर मिळविला चित्रपट...पाहा PHOTO

हे 'Outsiders' करणार बॉलीवूड मध्ये धमाकेदार एन्ट्री, प्रसिद्धीच्या जोरावर मिळविला चित्रपट...पाहा PHOTO

2021 मध्ये अनेक ‘outsiders’ बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. या कलाकारांनी याआधी विविध मालिकांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये सहय्यक कलाकार म्हणून काम केलं आहे. मात्र आता हे कलाकार एका मोठ्या नावासोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

0108

2021 मध्ये अनेक 'outsiders' बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. या कलाकारांनी याआधी वू=विविध मालिकांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये सहय्यक म्हणून काम केलं आहे. मात्र आता हे कलाकार एका मोठ्या नावासोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. यातीलच एक नाव म्हणजे श्रावणी वाघ होय. यशराज फिल्म्सच्या 'बंटी और बबली 2' मधून ही बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे. यात ती राणी मुखर्जी, सैफ अली खान यांच्यासोबत झळकणार आहे. श्रावणीनं याआधी कबीर खानच्या 'द फॉरगॉटन आर्मी' या ओटीटी वरील शोमध्ये काम केल आहे.

जाहिरात
0208

2017 मध्ये 'मिस वर्ल्ड' किताब पटकावणारी मानुषी चिल्लर ही 'पृथ्वीराज' या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे. यामध्ये ती अभिनेता अक्षय कुमार सोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट भारतीय योद्धा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. मानुषी यामध्ये राणी 'संयोगिता' ची भूमिका साकारणार आहे.

जाहिरात
0308

छोट्या पडद्यावर झळकलेला अभिनेता लक्ष्य लालवाणी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'दोस्ताना 2' या या धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटात तो झळकणार आहे. कोलीन डी कंहा यांनी याच दिग्दर्शन केलं आहे. त्याचबरोबर कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूरसुद्धा या चित्रपटात असणार आहेत.

जाहिरात
0408

प्रसिद्ध युट्युबर असलेला केरी मिनाटीसुद्धा बॉलीवूड पदार्पणास सज्ज झाला आहे. लवकरच to अजय देवगणच्या 'मे-डे' या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये एन्ट्री करणार आहे. यात अमिताभ बच्चन सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

जाहिरात
0508

शर्ली सेटिया या तरुण गायिकेनं तरुण पिढीला अक्षरशः वेड लावलं आहे. शर्ली आत्ता अभिनयातून सुद्धा चाहत्यांच मन जिंकणार आहे. नुकताच शर्लीनं ओटीटी वर 'मस्का' चित्रपटात अभिनय केला होता. त्यांनतर आता शर्ली एका बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. साबीर खान यांच्या 'निकम्मा' या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तिच्यासोबत अभिमन्यू दस्सनी हा अभिनेतासुद्धा असणार आहे. तसेच महत्वाच म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी या चित्रपटाद्वारे तब्बल 14 वर्षांनी बॉलीवूड मध्ये परतणार आहे.

जाहिरात
0608

'मिसमेच' या ओटीटी वरील शोद्वारे सर्वांचीच मनं जिंकणारी अभिनेत्री प्राजक्ता कोळी आता बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे. 'धर्मा' प्रोडक्शन च्या 'जुग जुग जियो' या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. यात तिच्यासोबत वरुण धवन, किआरा अडवाणी, अनिल कपूर, नीतू सिंग अशी तगडी कलाकार मंडळी असणार आहे.

जाहिरात
0708

छोट्या पडद्यावरील ओळखीचं नाव असणारं शंतनू महेश्वरीसुद्धा बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे. शंतनू हा अभिनेता आणि डान्सर म्हणून ओळखला जातो. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातून तो धमाकेदार एन्ट्री करणार आहे. आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या 'गंगुबाई काठडीयावाडी' या चित्रपटात तो झळकणार आहे.

जाहिरात
0808

'अर्जुन रेड्डी' चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री शालिनी पांडे सध्या बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे. यश राज फिल्म्सच्या 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात ती दिसणार आहे. यात तिच्यासोबत रणवीर सिंग सुद्धा मुख्य भूमिकेत असणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या