JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / चित्रपटगृहे उघडताच मल्टिप्लेक्सनं दिलं मोठं गिफ्ट! देत आहेत FREE मूव्ही TICKET

चित्रपटगृहे उघडताच मल्टिप्लेक्सनं दिलं मोठं गिफ्ट! देत आहेत FREE मूव्ही TICKET

कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) मल्टिप्लेक्स जे बऱ्याच काळापासून बंद होते ते उद्यापासून म्हणजेच 22 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,21ऑक्टोबर- कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) मल्टिप्लेक्स जे बऱ्याच काळापासून बंद होते ते उद्यापासून म्हणजेच 22 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ती चमक परतणार आहे. ग्लॅमरमध्ये आणखी भर घालण्यासाठी, मल्टीप्लेक्स चेन आयनॉक्स लेझर लिमिटेड ( Inox Leisure Ltd) प्रेक्षकांसाठी एक अद्भुत भेट घेऊन आली आहे. मल्टीप्लेक्स प्रेक्षकांना भेटवस्तू म्हणून मोफत चित्रपट तिकिटे वितरीत करत आहेत.

मल्टिप्लेक्स चेन आयनॉक्स लेझर लिमिटेडने जाहीर केलं आहे की ते 22 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्रातील कोणताही चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्या चित्रपटगृहात येणाऱ्या सर्व पाहुण्यांना बिनशर्त मोफत तिकीट देण्यात येईल. लोकांना ही ऑफर INOX वेबसाइट आणि अॅपवर मिळेल. येथे तुम्ही सकाळी 9 ते सकाळी 10 पर्यंत बुकिंग करून ही मोफत तिकिटे घेऊ शकता.केवळ महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनाच इनॉक्सच्या या ऑफरचा लाभ मिळू शकतो. या उपक्रमाद्वारे, INOX ला फक्त आपल्या पाहुण्यांचे आभार मानायचे आहेत. (**हे वाचा:** क्रिती सेनन बनली अमिताभ बच्चन यांची भाडेकरू; नव्या घरात साजरी करणार दिवाळी ) आयनॉक्स लेझर लिमिटेडचे ​​प्रादेशिक संचालक (पश्चिम) अतुल भांडारकर म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील चित्रपटगृहे शेवटी पुन्हा सुरू होण्यास तयार असल्याने आम्ही आमच्या पाहुण्यांना त्यांनी दिलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल बिनशर्त धन्यवाद देऊ इच्छितो. ते पुढे म्हणाले की, आमच्या पाहुण्यांचे स्वागत म्हणून आम्ही त्यांना 22 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 ते सकाळी 10 या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील सर्व मॉर्निंग शोसाठी मोफत तिकिटे देत आहोत.भारत कोरोना महामारीतून बाहेर पडत असताना, आम्ही राज्यभरातील चित्रपट प्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज आहोत’. (**हे वाचा:** मला वडिलांसारखं मरायचं नाही, ते सर्वात अपयशी..’; शाहरूखनं केलेलं वक्तव्य, Video ) साथीच्या आजारामुळे बंद झालेली चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाल्यामुळे, उद्योग-व्यवसायाला पुन्हा वाढण्याची संधी मिळेल. सिनेमा हॉल आणि थिएटर 50 टक्के क्षमतेसह पुन्हा सुरू होतील. ज्यांनी पूर्णपणे लसीकरण केलं आहे. फक्त त्या लोकांना येण्याची परवानगी असेल. सर्व पाहुण्यांना मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे, खोकताना,शिंकताना चेहरा झाकणे आणि हाताची नियमित स्वच्छता यासह कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या