JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सलग 7 फ्लॉप चित्रपट देऊनही रिया चक्रवर्तीकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती!

सलग 7 फ्लॉप चित्रपट देऊनही रिया चक्रवर्तीकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती!

इंजिनिअर ते अभिनेत्री असा होता रियाचा प्रवास, 7 चित्रपट फ्लॉप देऊनही आहे इतक्या कोटींची मालकीण

019

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh Rajput case) मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती या त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव समोर आले. त्यानंतर रियाच्या खासगी आणि वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा होऊ लागली. तर रियावर अनेक आरोपही करण्यात आले.

जाहिरात
029

सध्या ईडीच्या वतीनं रियाची चौकशी केली जात आहे. गेल्या एका वर्षापासून सुशांतसोबत असलेल्या रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त आणि फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांची सध्या सीबीआय चौकशी करत आहेत. ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान रियाच्या संपत्तीबाबत खुलासा झाला.

जाहिरात
039

रियाचा जन्म 1 जुलै 1992मध्ये बंगळुरूमध्ये झाला. रियाचे वडील बंगाली आणि आई कोंकणी असून रियाचे वडील सैन्यात डॉक्टर आहेत. मीडिया अहवालांच्या मते सीबीआयकडून रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात
049

रियानं इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ती Mtvच्या रिअॅलिटी शो 'टीन दिवा'च्या माध्यमातून ग्लॅमरच्या जगतात आली. त्यानंतर Mtvची व्हिडीओ जॉकी म्हणून काम करू लागली.

जाहिरात
059

मात्र चित्रपटांमध्ये रियाला तिचा पहिला ब्रेक 2012 मिळाला. तिने तेलगू फिल्म 'तुनेगा तुनेगा'तून पदार्पण केले. मात्र चित्रपट प्लॉप झाला.

जाहिरात
069

त्यानंतर 2013 मध्ये रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने 'मेरे डॅड की मारुती' या सिनेमामध्ये काम केले. मात्र हा सिनेमाही फ्लॉप झाला. त्यानंतर 2014मध्ये सोनाली केबल सिनेमात काम केले, मात्र हा ही अपयशी ठरला

जाहिरात
079

2017 मध्ये आलेल्या बँक चोर आणि 2018 मध्ये आलेल्या जलेबी मध्ये रियाला मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारण्याची संधी मिळाली. हे सिनेमेही फ्लॉप झाले. गेल्या 8 वर्षात रियानं एकही यशस्वी चित्रपट केला नाही आहे.

जाहिरात
089

असे असले तरी रियाचे वार्षिक उत्पन्न 10-15 लाख रुपयांच्या जवळपास आहे. मात्र तिच्या जवळ मुंबईमध्ये कोट्यावधींची संपत्ती आहे. रियाला एका सिनेमासाठी 25-30 लाख रुपये मिळायचे. तर जाहीरातींसाठी 3 ते 5 लाख.

जाहिरात
099

त्यामुळे सलग 7 फ्लॉप चित्रपट देऊनही रियाकडे असलेल्या संपत्तीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रियावर सुशांतच्या अकाउंटमधून 15 कोटीही फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या