कंगनापूर्वी अनेक अभिनेत्रींनी इंदिरा गांधीची भूमिका साकारली आहे. याविषयी तुम्हाला माहित आहे का?, चला तर मग जाणून घेऊया
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट इमर्जन्सी चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून या चित्रपटातील कंगना राणौतचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात कंगनानं दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
कंगनापूर्वी अनेक अभिनेत्रींनी इंदिरा गांधीची भूमिका साकारली आहे. याविषयी तुम्हाला माहित आहे का?, चला तर मग जाणून घेऊया
आंधी या चित्रपटात सुचित्रा सेनने एका नेत्याची भूमिका साकारली होती. त्यांच्या या सशक्त भूमिकेमुळे त्यांची तुलना इंदिरा गांधीशी करण्यात आली होती. हा चित्रपट 1975 मध्ये प्रदर्शित झाला होता.
लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणेने विवेक ओबेरॉय यांच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. किशोरी यांच्या भूमिकेविषयीदेखील खूप चर्चा झाली होती.
सुप्रिया विनोद यांनी 2017 मध्येही इंदिरा गांधीची भूमिका पुन्हा एकदा साकारलेली पहायला मिळाली. मधुर भांडारकरच्या इंदू सरकार या चित्रपटात त्यांनी ही भूमिका साकारली होती.
यशवंतराव चव्हाण : बखर एका वडाची या मराठी चित्रपटात अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी इंदिरा गांधीची भूमिका साकरली होती. या चित्रपटातील अभिनेत्रीचा लूक इंदिरा गांधींसारखाच बनवलेला पहायला मिळाला.
'बेलबॉटम' या चित्रपटात अभिनेत्री लारा दत्ताने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. यामध्ये लाराला ओळखणही कठिण झालं होतं.
ठाकरे चित्रपट जोरदार चर्चेत आला होता. या चित्रपटात अभिनेत्री अवंतिका आकरकरने इंदिरा गांधीची भूमिका साकारली होती.