JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / तुम्हाला माहित आहे का 'आशालता' यांच्या नावामागचं गुपित? अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर चित्रपटसृष्टीत हळहळ

तुम्हाला माहित आहे का 'आशालता' यांच्या नावामागचं गुपित? अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर चित्रपटसृष्टीत हळहळ

आशालता वाबगावकर यांना शूटिंगदरम्यान कोरोनाची लागण झाली होती, याशिवाय सेटवरील 27 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 सप्टेंबर : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालयात वाबगावकर यांचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सातारा येथे ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. काल त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अख्ख्या मराठी चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली आहे. मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईहून एक डान्सग्रुप आला होता. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानंतर तेथील तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यातच वयाच्या 79 व्या वर्षी आशालता यांची प्राणज्योत मालवली. यानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आशालता यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेता अशोक सराफ यांनी आपली मोठी बहिण गमावल्याची भावना व्यक्त केली. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश टिकेकर यांनी आशालता यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं. यावेळी ते खूप भावुक झाले होते. त्यांनी आशालता यांच्यासोबत काम केलं आहे. यावेळी त्यांनी आशालता यांच्या नावाशी संबंधित एक अनुभव शेअर केला. त्यांनी सांगितलं की, एकदा त्यांच्यासोबत संवाद साधत असताना आशालता या नावाचं गुपित विचारलं. त्यांना उत्तर देताना आशालता म्हणाल्या की, आई-वडिलांना लता मंगेशकर आणि आशा भोसले अत्यंत आवडत्या होत्या. खरं पाहिलं तर ते त्या दोघींचे खूप मोठे फॅन होते. यामुळे दोघांच्या नावाशी जूळणारं नाव आपल्या मुलीला ठेवावं यातून आशालता हे नाव त्यांना सूचलं. आशालताताईंनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. ह्या शिक्षणाचा त्यांना अभिनय क्षेत्रातही उपयोग झाला होता. संगीत विषयावर आधारीत ‘गर्द सभोवती’ हे पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं.

संबंधित बातम्या

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्विट करीत आशालता यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आज फार हतबल झाल्ये. कोविडनी एक अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला. आशालता ताईं अनंतात विलीन झाल्या. अत्यंत मायाळू, प्रेमळ, संवेदनशील, उत्तम कलाकार. मला नेहमीच “बाळा” म्हणत आशीर्वाद देणाऱ्या आशालता ताईच्या आत्म्याला शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली आशालता यांची कारकीर्द रंगभूमीवरील प्रवास - मत्स्यगंधा - गुंतता ह्रदय हे - वाऱ्यावरची वरात - छिन्न - महानंदा रुपेरी पडद्यावरील प्रवास - 100 हून अधिक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय - जंजीर (1973) - चलते चलते (1976) - अपने पराये (1981) - आहिस्ता आहिस्ता (1981) - उंबरठा (1982) - शौकीन (1982) - लव्ह इन गोवा (1983) - कूली (1983) - सदमा (1983) - हमसे है जमाना (1983) - वहिनीची माया (1985) - शराबी (1984) - अंकुश (1986) - गंमत जंमत (1987) - घायल (1990) - माहेरची साडी (1991) - फौजी (1994) - अग्नीसाक्षी (1996) - बेटी नंबर 1 (2000) - वन रूम किचन (2011) - सनराईज (2014)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या