JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकी कोण माहीत आहे का? माहिती नसतील या गोष्टी

‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकी कोण माहीत आहे का? माहिती नसतील या गोष्टी

स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘पिंकीचा विजय असो’ सुरू होतेय. नवोदित अभिनेत्री शरयू सोनावणे पिंकी ही भूमिका साकारणार असून या मालिकेच्या निमित्ताने तिच्याशी केलेली ही खास बातचित.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जानेवारी- मनोरंजनाच्या प्रवाहात सातत्याने नवनवे प्रयोग करणारी महाराष्ट्राची नंबर वन वहिनी नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी भेट घेऊन येणार आहे. 17 जानेवारीपासून रात्री 11 वाजता स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘पिंकीचा विजय असो’ ( pinkicha vijay aso) सुरू होतेय. नवोदित अभिनेत्री शरयू सोनावणे (sharayu sonawane) पिंकी ही भूमिका साकारणार असून या मालिकेच्या निमित्ताने तिच्याशी केलेली ही खास बातचित. यावेळी शरयू सोनावणेला काही प्रश्न विचारण्यात आले. यातून तिच्याविषयी काही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेता आले. पिंकीचा विजय असो या मालिकेतील तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काय सांगशिल? यावेळी तिला पिंकीचा विजय असो या मालिकेतील तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काय सांगशिल.. असं विचारण्यात आलं. ती म्हणाली की, आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अश्या ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. दुसऱ्याकडून काम करुन घेण्याचं अजब कसब पिंकीकडे आहे. तिची इंग्रजी बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल. वाचा- Video : स्टार प्रवाहवर रिमेकची चलती ; नवीन वर्षात भेटीला येणार लग्नाची बेडी पिंकी आणि शरयूमध्ये काही साम्य आहे का? पिंकी आणि शरयूमध्ये काही साम्य आहे का?..यावर शरयू म्हणाली की, पिंकी आणि शरयूमध्ये अजिबात साम्य नाही. पिंकी बिनधास्त आहे. तिची अखंड बडबड सुरु असते. पिंकीच्या स्वभावाच्या पूर्ण विरोधी असा माझा स्वभाव आहे. मी खूपच शांत आहे. त्यामुळे पिंकी साकारणं हे माझ्यासाठी नवं आव्हान आहे. पिंकीची बोलण्याची स्टाईल माझ्या इतकी अंगवळणी पडली आहे की शूटिंग व्यतिरिक्तही मी इतरांशी संवाद साधताना त्याच भाषेत बोलते. वाचा- बॉलिवू़डमध्ये कोरोनाचा कहर! आज तीन नावांची पडली भर, एकतालाही लागण तु मुळची मुंबईची, शूटिंग साताऱ्यामध्ये सुरु आहे. सेटवर कसं वातावरण असतं? यावेळी शरयूला सेटवर कसं वातावरण असतं याबद्दल देखील विचारण्यात आलं. ती म्हणाली की, सेट हे माझं दुसरं घरच आहे. सहकलाकार आणि आमचे दिग्दर्शक मला खूप समजून घेतात. पिंकी हे पात्र उभं करण्यात आमच्या संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे. माझ्या लहान भावाची भूमिका साकारणाऱ्या हर्षद नायबळसोबत मी सेटवर खूप धमाल करते. त्याच्यावर ताईगिरी दाखवतानाच भावाच्या मायेने प्रेमही करते. त्यामुळे नव्या वर्षाने मला नवं कुटुंब दिलंय असंच म्हणायला हवं.

संबंधित बातम्या

अभिनया व्यतिरिक्त तुझ्या काय आवडी-निवडी आहेत? अभिनया व्यतिरिक्त शरयू तिच्या आवडी-निवडीविषयी सांगताना म्हणते की, मला नृत्याची आवड आहे. मी भरत नाट्यम शिकले आहे. डान्सच्या निमित्ताने माझे महाराष्ट्रभर दौरे सुरु असतात. मी ड्रीमगर्ल हेमामालिनी यांच्यासोबत यशोदा-कृष्ण बॅले करायचे ज्यात मी नृत्यामधून कृष्ण साकारला आहे. हा अनुभव थक्क करणारा आहे. माझी ही नृत्याची आवड मला पिंकी हे पात्र साकारताना देखिल उपयोगी पडते आहे. डान्सचे अनेक सिक्वेन्स आम्ही मालिकेत शूट केले आहेत जे प्रेक्षकांना पहाताना नक्कीच मजा येईल. तेव्हा पाहायला विसरु नकी नवी मालिका पिंकीचा विजय असो 17 जानेवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या