08 डिसेंबर : बाॅलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा इको फ्रेंडली आहे. तिनं स्वत: तिच्या आयुष्यात प्लास्टिकचा उपयोग 80 टक्के कमी केलाय. ती प्लॅस्टिकचा वापर असलेले सॅनिटरी नॅपकिन्सही वापरत नाही. दिया मिर्झा भारतातर्फे युएनओची पर्यावरण सद्भावना दूत बनलीय. ती नेहमी पर्यावरणासाठी काम करते. प्रदूषण कमी होण्याच्या योजनांमध्ये तिचा सहभाग असतो. आणि वैयक्तिक आयुष्यातही ती त्याचं पालन काटेकोरपणे करते. ती स्वत: पाण्याची प्लास्टिक बाटली आणि प्लास्टिकचा टूथब्रशही वापरत नाही. दिया म्हणते, वापरलेले प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपर्समुळे जास्त प्रदूषण होतं. कारण या गोष्टी पूर्ण नष्ट होत नाहीत. म्हणून त्याऐवजी दुसरे पर्याय वापरावेत. तिनं बायो-डिग्रेडेबल पॅड्स वापरण्याचा सल्लाही दिलाय. ती स्वत: सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिराती करायला नकार देते. दिया संजय दत्तवरच्या सिनेमात दिसणार आहे. ती मान्यता दत्तच्या भूमिकेत असेल.