बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आयोजित करण्यात आलेली पार्टी नेहमीच चर्चेत असते, मग ती बर्थडे पार्टी असो किंवा सणासुदीची. बॉलिवूडमध्ये प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीपासून ते होळीपर्यंत, बी-टाउन स्टार्स हा सण उत्साहात साजरा करतात. विशेषतः दिवाळी पार्टीची खूप चर्चा असते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांची दिवाळी पार्टी नेहमीच चर्चेत असते. यामध्ये अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंतच्या नावांचा समावेश आहे.
अमिताभ बच्चन- दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर अमिताभ बच्चन त्यांच्या घरी एक पार्टी आयोजित करतात. ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी हजेरी लावतात. मात्र, कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षी ही पार्टी होऊ शकली नाही.
शाहरुख खान- शाहरुख खानच्या दिवाळी पार्टीला बी-टाउनची शान म्हटले जाते. या पार्टीत करण जोहर, काजोल, आलिया भट्ट ते करीना, सलमान असे सगळे स्टार्स सहभागी होतात.
शिल्पा शेट्टी कुंद्रा- शिल्पा शेट्टी कुंद्राची दिवाळी पार्टीसुद्धा कुणापेक्षा कमी नाही. शिल्पा पती राज कुंद्रासोबत दरवर्षी दिवाळी पार्टीचे आयोजन करते. ज्यामध्ये इंडस्ट्रीतील नामवंत कलाकार सहभागी होतात. मात्र, यंदा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे पार्टी होण्याची चिन्हे अजिबात दिसत नाहीयेत.
अनिल कपूर- अनिल कपूरच्या दिवाळी पार्टीच्या चर्चाही कमी नाहीत. दरवर्षी दिवाळीची पार्टी अनिल आणि त्याची पत्नी सुनीता आयोजित करतात. जी इंडस्ट्रीतील जबरदस्त पार्टींमध्ये गणली जाते.
एकता कपूर- टीव्ही ड्रामा क्वीन एकता कपूरही दरवर्षी तिच्या घरी दिवाळीची जबरदस्त पार्टी करते. ज्यामध्ये टीव्हीपासून ते बॉलीवूड स्टार्सचा जणू मेळावाच पाहायला मिळतो.
आमिर खान- बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान देखील दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर एका पार्टीचे आयोजन करतो, ज्यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टार्स उपस्थित राहण्यास विसरत नाहीत.