JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / BIG NEWS:26 वर्षांनंतर नव्या रूपात दिसणार'DDLJ'; 'या' नावाने आदित्य चोप्रा करणार दिग्दर्शन

BIG NEWS:26 वर्षांनंतर नव्या रूपात दिसणार'DDLJ'; 'या' नावाने आदित्य चोप्रा करणार दिग्दर्शन

बॉलिवूड(Bollywood ) चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा त्याच्या रेकॉर्डब्रेक जागतिक ब्लॉकबस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून ब्रॉडवेमध्ये पदार्पण करणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,22ऑक्टोबर- बॉलिवूड**(Bollywood )** चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा त्याच्या रेकॉर्डब्रेक जागतिक ब्लॉकबस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून ब्रॉडवेमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच या चित्रपटाला 26वर्षे पूर्ण झाली आहेत. तब्बल 26 वर्षांनंतर, DDLJ चे नवीन रूप दिसणार आहे. 1995 नंतर, ‘राज’ आणि ‘सिमरन’ ची प्रेमकथा ब्रॉडवे म्युझिकल म्हणून ओळखली जाणार हे निश्चित आहे. आदित्य चोप्राने शनिवारी घोषणा करून चाहत्यांना हे नवीन सरप्राईज दिलंआहे. आदित्य चोप्रा गेल्या ३ वर्षांपासून या प्रकल्पावर काम करत आहे.

संबंधित बातम्या

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील ‘राज’ आणि सिमरनची ही प्रेमकथा ‘म्युझिक प्ले’ अर्थात ब्रॉडवे म्हणून रंगमंचावर सादर केली जाणार आहे. ‘कम फॉल इन लव्ह: द डीडीएलजे म्युझिकल’चा प्रीमियर अमेरिकेतील सॅन डिएगो येथील ओल्ड ग्लोब थिएटरमध्ये होणार आहे. संगीत टीम- विशाल-शेखर या ब्रॉडवेसाठी संगीतकार म्हणून काम करणार आहेत. विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी संगीतकार म्हणून काम करतील. तर आदित्यने त्याच्या पहिल्या नाट्यप्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनुभवी तंत्रज्ञांची टीम निवडली आहे. दरम्यान, टोनी आणि एमी विजेता रॉब अॅशफोर्ड (फ्रोझन, थॉरली मॉडर्न मिली, द बॉयज फ्रॉम सिरॅक्यूज) सह्हायक कोरिओग्राफर श्रुती मर्चंटसोबत निर्मिती कोरिओग्राफ करणार आहेत. कधी होणार प्रीमियर- ‘कम फॉल इन लव्ह: डीडीएलजे म्युझिकल’ 2022–2023 मध्ये ब्रॉडवे रंगमंचावर सादर केलं जाणार आहे. सप्टेंबर 2022 दरम्यान सॅन डिएगोच्या ओल्ड ग्लोब थिएटरमध्ये त्याचा वर्ल्ड प्रीमियर निश्चित करण्यात आला आहे. आदित्यचा असा विश्वास आहे की म्युझिकल ब्रॉडवे हे भारतीय चित्रपटांसारखंच आहे. आणि यामध्ये दोन प्रेमी आहेत जे वर्षानुवर्षे विभक्त आहेत, जे त्यांच्या पहिल्या ब्रॉडवे शो ‘कम फॉल इन लव: द डीडीएलजे म्युझिकल’ मध्ये प्रथमच दिसणार आहे. फार कमी लोकांना माहित असेल की आदित्यला आधी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा इंग्रजी चित्रपट बनवायचा होता आणि त्यासाठी त्याला टॉम क्रूझला या चित्रपटात नायक म्हणून कास्ट करायचं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या