JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / दीपिका पदुकोण आणि अमृता रावमध्ये आहे 'हे' नातं, फॅमिली फंक्शनमध्ये दिसले एकत्र

दीपिका पदुकोण आणि अमृता रावमध्ये आहे 'हे' नातं, फॅमिली फंक्शनमध्ये दिसले एकत्र

काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी एका नातेवाईकांच्या लग्नाला हजेरी लावली होती.

0106

बॉलिवूडमध्ये एका अभिनेत्यानं दुसऱ्या अभिनेत्याच्या नात्यातील व्यक्तीशी लग्न करणं नवं नाही. एकीकडे अनिल कपूरची पत्नी ही रणवीर सिंहची नातेवईक आहे. तर आमिर खानची एक दूरची नातेवाईक पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरची पत्नी आहे.

जाहिरात
0206

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपापसात एकमेकांचे नातेवाईक आहेत. बॉलिवूडमधील अशाच एका नात्याचा खुलासा नुकत्याच एका फॅमिली फंक्शनमध्ये झाला.

जाहिरात
0306

काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी एका नातेवाईकांच्या लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यावरुन बॉलिवूडमधील एका नव्या नात्याचा खुलासा झाला.

जाहिरात
0406

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये रणवीर सिंह आणि दीपिका सोबत अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती आर जे अनमोल दिसत आहे.

जाहिरात
0506

दीपिका पदुकोणचा चुलत भाऊ आणि अमृता रावची चुलत बहिण यांचं हे लग्न होतं. त्यामुळे या लग्नानंतर दीपिका आणि अमृता दूरच्या का असेनात पण एकमेकींच्या नातेवाईक झाल्या आहेत.

जाहिरात
0606

दीपिका लवकरच मेघना गुलजारच्या 'छपाक'मध्ये दिसणार आहे. तर रणवीर सध्या त्याचा आगामी सिनेमा '83' ची तयारी करत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या