JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'धर्मवीर' फेम प्रसाद ओक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, काय आहे कारण?

'धर्मवीर' फेम प्रसाद ओक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, काय आहे कारण?

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या अभिनेता प्रसाद ओकचं नाव चर्चेत आहे. या अभिनेत्याने ‘चंद्रमुखी’ आणि ‘धर्मवीर’ या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 सप्टेंबर-   मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या अभिनेता प्रसाद ओकचं नाव चर्चेत आहे. या अभिनेत्याने ‘चंद्रमुखी’ आणि ‘धर्मवीर’ या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्याच्या धर्मवीर या चित्रपटासाठी त्याचं अजूनही कौतुक होत आहे. दरम्यान अभिनेत्याने नुकतंच सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत सहभोजनसुद्धा केलं. प्रसादने स्वतः फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला होता. अद्यापही या चित्रपटाची चर्चा होत असलेली पाहायला मिळते. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील प्रसादच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. तसेच या चित्रपटात अभिनेता क्षितीश दातेने  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे अभिनेता प्रसाद ओकचं एकनाथ शिंदेसोबत चांगलं नातं तयार झालं आहे. दरम्यान अभिनेत्याने नुकतंच आपल्या कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांच्यासोबत भोजनाचाही आस्वाद घेतला आहे. प्रसाद ओक इन्स्टाग्राम पोस्ट- काल “वर्षा” वर मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेबांसोबत सहकुटुंब सहभोजनाचा योग आला.मनःपूर्वक आभार मा. खा. श्रीकांत शिंदे साहेब आणि मा. एकनाथ जी शिंदे साहेब…!!!

संबंधित बातम्या

**(हे वाचा:** धर्मवीर’ सिनेमा आणि महाराष्ट्रातील सत्तांतर यांचा परस्पर संबंध होता का?; पाहा काय म्हणाला प्रसाद ओक ) यावेळी वर्षावर प्रसादसोबत पत्नी आणि अभिनेत्री मंजिरी ओक आणि मुलगासुद्धा उपस्थित होता. ‘चंद्रमुखी’ आणि ‘धर्मवीर’ चित्रपटानंतर आता प्रसाद ओक ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्यावर आधारित चित्रपट काढण्याच्या तयारीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या