JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'तू तर सेम प्रियांका चोप्रा' धनश्री काडगावकरच्या वेस्टर्न LOOK वर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स; पाहा PHOTO

'तू तर सेम प्रियांका चोप्रा' धनश्री काडगावकरच्या वेस्टर्न LOOK वर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स; पाहा PHOTO

मराठमोळी अभिनेत्री धनश्री काडगावकर ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. या मालिकेतील तिच्या ‘वहिनीसाहेब’ या भूमिकेने चाहत्यांना भुरळ पाडली होती.

0108

मराठमोळी अभिनेत्री धनश्री काडगावकर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. या मालिकेतील तिच्या 'वहिनीसाहेब' या भूमिकेने चाहत्यांना भुरळ पाडली होती.

जाहिरात
0208

सध्या ही मालिका बंद झाली असली, तरी आजही प्रेक्षक धनश्रीला वाहिनीसाहेब म्हणूनच ओळखतात. आणि तितकंच प्रेमही आजही तिला देतात.

जाहिरात
0308

धनश्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आजही ती अशाच कारणाने चर्चेत आली आहे. आज ती आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे.

जाहिरात
0408

अभिनेत्रीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0508

धनश्री ग्रीन कलरच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये आणि स्ट्रेट हेअरमध्ये अक्षरशः चाहत्यांना घायाळ करत आहे.

जाहिरात
0608

तिचा हा लूक पाहून चाहते फारच खुश आहेत. अभिनेत्रींच्या या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.

जाहिरात
0708

काही युजर्सनी तर चक्क धनश्रीला तू अगदी प्रियांका चोप्रा सारखी दिसतेस असं म्हटलं आहे. एकंदरीतच धनश्रीचे हे फोटो चाहत्यांना फारच आवडलेले दिसत आहेत.

जाहिरात
0808

धनश्रीने काही महिन्यांपूर्वी एका मुलाला जन्म दिला आहे. या काळात तिचं वजन वाढलं होतं. दरम्यान तिला ट्रोलही केलं गेलं होतं. मात्र अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत अशा लोकांना चपराक दिली होती. आज तिने मोठ्या प्रमाणात आपलं वजन कमी केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या