JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडची मस्तानी होती या अभिनेत्याची दिवानी, झोपण्याआधी पोस्टरला करायची KISS

बॉलिवूडची मस्तानी होती या अभिनेत्याची दिवानी, झोपण्याआधी पोस्टरला करायची KISS

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं स्वतःबद्दल बरेच खुलासे केले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 मे : अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या बॉलिवूडची सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. सिनेमातील अभिनयसोबतच दीपिका तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. सध्या दीपिका पती रणवीरसोबत मुंबईमध्ये होम क्वारंटाइन आहे. नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी तिनं तिच्या एका मजेदार सवयीचा खुलासा केला. दीपिकानं नुकातंच वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, मी आणि माझी बहीण अनिशा बालपणी रुम शेअर करायचो. आम्ही सोफ्यावर बसून तासंतास ‘हाऊस’ खेळायचो. आमच्या घराच्या भिंतीवर त्यावेळी हॉलिवूड सिनेमा टायटॅनिकचा अभिनेता लिओनार्डो डीकॅप्रिओची बरीच पोस्टर होती. आम्ही दोघंही झोपण्याआधी त्यावर किस करून त्याला गुडनाइट म्हणायचो आणि मग झोपायचो.

दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या बहिणीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. एका मुलखातीत तिनं सांगितलं होतं की तिची बहीण तिची सर्वात मोठी समीक्षण आहे. दीपिका म्हणाली, मी कधीच माझ्या बहीणीच्या बोलण्याचं वाईट वाटून घेत नाही. करण मला माहित आहे की ती खूप प्रामाणिक आहे. तिला नेहमी वाटतं की माझ्या आयुष्यात मी सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे कराव्या.

दीपिका पदुकोण शेवटची छपाक सिनेमात दिसली होती. ज्यात तिनं एका अॅसिड हल्ला झालेल्या मुलीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा फारसा चालला नसला तरीही या सिनेमातील तिच्या भूमिकेच कौतुक मात्र खूप झालं. लवकरच दीपिका रणवीर सिंहसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती कपिल देव यांच्या पत्नीची म्हणजेच रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारत आहे. लग्नानंतर रणवीर दीपिकाचा एकत्र हा पहिलाच सिनेमा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या