अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले आहे. इटलीमध्ये झालेल्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये कोकणी आणि सिंधी रितीरिवाजानुसार हे लग्न पार पडले होते. या जोडप्याने काही वेळेपूर्वी त्यांच्या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले आहे. इटलीमध्ये झालेल्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये कोकणी आणि सिंधी रितीरिवाजानुसार हे लग्न पार पडले होते. या जोडप्याने काही वेळेपूर्वी त्यांच्या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
बिनसारमध्ये दोघांनीही निसर्गाच्या कुशीत खूप रोमँटिक पद्धतीने एकमेकांसोबत वेळ घालवला. दीपिकाने इंस्टाग्रामवर असे फोटो शेअर केले आहेत ज्यात दोघे अगदी साध्या अंदाजात पण प्रेमात असलेले दिसून येत आहेत.जे पाहून चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की त्यांनी त्यांची सुट्टी कुठे साजरी केली. दीपिका-रणवीरने अल्मोडा येथे लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. बिनसारमध्ये दोघांनीही निसर्गाच्या कुशीत खूप रोमँटिक पद्धतीने एकमेकांसोबत वेळ घालवला.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी सुंदर ठिकाणी घालवलेल्या सुंदर क्षणांचे मोनोक्रोमिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अतिशय साध्या पण निवांत शैलीत हे कपल दिसत आहे.दीपिका पदुकोणने इंस्टाग्रामवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवलेले दिसत आहेत.
रणवीरसोबतचे मोनोक्रोमिक फोटो शेअर करताना दीपिका पदुकोणने लिहिले आहे,'आणि मग..'(और फिर)' या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, यासोबत तिने हार्ट इमोजी शेअर केला आहे. चाहत्यांनी दीपिकाच्या फोटोंना प्रचंड लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या आयुष्यातील खास क्षणांचा आनंद लुटण्याचा एक अनोखा मार्ग निवडला आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने हे फोटो शेअर करताच तासाभरात साडेसहा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बिनसार येथील मेरी बटन रिसॉर्टमध्ये होते. येथे या जोडप्याने आपला सगळा वेळ निसर्गाच्या कुशीत घालवला.
हे फोटोच साक्ष देतात की दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकांमध्ये विश्रांतीचे काही क्षण घालवले आहेत.