JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘कॉमेडी किंग’ ओंकार भोजनेची 'हास्यजत्रा'मधून एक्झिट; दिसणार या नव्या कार्यक्रमात

‘कॉमेडी किंग’ ओंकार भोजनेची 'हास्यजत्रा'मधून एक्झिट; दिसणार या नव्या कार्यक्रमात

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. तो आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावतो.

जाहिरात

ओंकार भोजने

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑक्टोबर : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. तो आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावतो. याशिवाय ओंकारला कॉमेडीच्या परफेक्ट टाईमिंगसाठीही ओळखलं जातं. त्याच्या कॉमेडीच्या अचूक टाईमिंगचे अनेक चाहते असून तो कायमच त्याच्या विनोदी शैलीमुळे चर्चेत असतो. अशातच ओंकार भोजने पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून बाहेर पडणार असल्याचं समोर आलं आहे. ओंकार भोजने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून एक्जिट घेणार असल्याची बातमी समोर आलीये. मात्र तो लवकरच दुसऱ्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. ओंकार लवकरच फू बाई फू च्या नव्या पर्वात दिसणार आहे. त्यामुळे चाहते आनंदीही आहेत आणि दुःखीही. ओंकारने घेतलेल्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

संबंधित बातम्या

मनोरंजन मराठी ऑफिशिअल या इन्स्टाग्रामवर याविषयी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘अनेकजण त्याला’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम बेस्ट असून तू उगाच सोडला, असं म्हणत आहेत.‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बेस्ट आहे ऑल द टाईम, या कार्यक्रमातच छान होता तू’, अशा अनेक कमेंट या पोस्टवर येताना दिसत आहे.

दरम्यान, छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ होय. या कार्यक्रमाने फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर जगभरातील रसिक प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. यामध्ये अनेक दिग्गज कलाकार कॉमेडीचे डोस देताना दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या