JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / हार्ट सर्जरीनंतर Sunil Grover ची पहिली Insta पोस्ट, VIDEO शेअर करत दिला महत्वाचा संदेश

हार्ट सर्जरीनंतर Sunil Grover ची पहिली Insta पोस्ट, VIDEO शेअर करत दिला महत्वाचा संदेश

Sunil Grover First Insta Post After Heart Surgery-सुनील ग्रोव्हरने नुकतंच इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 फेब्रुवारी- प्रसिद्ध कॉमेडियन   (Comedian)  आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) सध्या चर्चेत आहे. त्याच्यावर नुकतंच मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हृदय शस्त्रक्रिया झाली  (Sunil Grover heart surgery)  होती. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच सुनील ग्रोव्हरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. असं असूनही त्याचे चाहते आणि मित्र त्याच्या तब्येतीबद्दल चिंतेत होते. अशा परिस्थितीत स्वतः सुनील ग्रोव्हरने आपला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत आपल्या तब्येतीची माहिती दिली आहे. सुनील ग्रोव्हरने नुकतंच  इन्स्टाग्राम अकाऊंटवर  एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता उगवत्या सूर्याचा आनंद घेत आहे. सोबतच आनंदाने डान्ससुद्धा करत आहे. सुनीलने हा व्हिडीओ शेअर करत एक अत्यंत महत्वाचं कॅप्शनसुद्धा दिलं आहे. कॅप्शन देत सुनीलने म्हटलं आहे, ‘तुमच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि प्रार्थनेने मी बरा होत आहे. कृतज्ञता आणि धन्यवाद. जर तुम्ही सूर्योदयाचे साक्षीदार आहात, तर तुम्ही सर्वात भाग्यवान आहात’.असं म्हणत सुनीलने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. चाहत्यांसोबत कलाकारांनी केल्या कमेंट्स- सुनील ग्रोव्हरने हा व्हिडीओ शेअर करताच चाहते त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. आपल्या अभिनेत्याला पुन्हा एकदा आनंदात पाहून सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत. तसेच त्याला पूर्ण बरा शुभेच्छा देत आहेत. सोबतच सुनीलच्या अनेक कलाकार मित्रांनीसुद्धा कमेंट्स करत अभिनेत्याला लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुषार कपूर, हितेन तेजवानी, राघव जुयाल,जस्सी गिल, सोफी चौधरी अशा अनेक कलाकारांनी सुनीलला पुन्हा एकदा आपल्या कामावर परतण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

सुनील ग्रोव्हर ट्विट- इन्स्टा पोस्टपूर्वी सुनील ग्रोव्हरने काल एक ट्विट करत आपल्या चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती. आपल्यावर चांगले उपचार करण्यात आले आणि आता आपण ठीक असल्याचं त्यानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासाठी त्याने सर्वांचे आभारही व्यक्त केले आहेत. सुनील ग्रोव्हरने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, ‘भाऊ चांगले उपचार झाले आहेत. माझी प्रकृती ठीक होत आहे… तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांसाठी, कृतज्ञता हीच माझी भावना आहे.. ठोक्को ताली.’ अशा मजेशीर पद्धतीने माहिती देत अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना चिंतामुक्त केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या