कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा राडा, 'या' दोन कलाकारांमध्ये कोल्ड वॉर ?

नुकतीच शोमध्ये आलेली भारती सिंह आणि किकू शारदा या दोन कलाकारांमध्ये कपिलच्या शोच्या सेटवर कोल्ड वॉर चालू झालंय

Chittatosh Khandekar
27 जुलै : कपिल शर्माचा 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' या शोच्या मार्गात येणाऱ्या अडचणी संपता संपत नाहीयेत. आधी सुनील ग्रोवरचं शो सोडून जाणं, त्यानंतर शोची टीआरपी घसरणं, आणि काही दिवसांपूर्वी कपिल आजारी पडल्यामुळे शोचं शुटिंग थांबलं होतं. पण आता या शोसमोर एक नवीन अडचण निर्माण झालीय. या शोच्या दोन कलाकारांमध्ये आता कोल्ड वॉर सुरू झालंय. 

पण या दोघांनीही या बातम्यांना अफवा म्हटलंय. किकूने या बातम्या खोट्या आहे असं म्हटलंय तर भारतीने किकू हा माझा चांगला मित्र आहे आणि असं काहीही झालेलं नाही असं सांगितलंय.

Trending Now