JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सूर्यकांत मांढरे ते अमोल कोल्हे; पाहा रुपेरी पडद्यावर शिवराय साकारणारे अभिनेता

सूर्यकांत मांढरे ते अमोल कोल्हे; पाहा रुपेरी पडद्यावर शिवराय साकारणारे अभिनेता

‘या’ अभिनेत्यांनी साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

0108

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. महाराजांचा इतिहास आजवर आपण अनेकदा चित्रपट आणि मालिकांमधून पाहिला आहे. आज शिवजयंतीच्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर शिवरायांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांवर एक नजर मारुया...

जाहिरात
0208

ब्लॅक अँड व्हाईटच्या काळात अभिनेते सुर्यकांत मांढरे यांनी शिवरायांची भूमिका साकारली होती. ‘स्वराज्याचा शिलेदार’, ‘पावनखिंड’, ‘धन्य ते संताजी धनाजी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.

जाहिरात
0308

अभिनेते अमोल कोल्हे यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट, नाटकं, मालिकांमध्ये त्यांनी अनेकदा शिवरायांची भूमिका साकारली आहे.

जाहिरात
0408

अभिनेता, लेखक चिन्मय मांडलेकर यानं फत्तेशिकस्त या मराठी चित्रपटात महाराजांची भूमिका साकारली होती.

जाहिरात
0508

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता.

जाहिरात
0608

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत अभिनेता शंतनू मोघे यानं महाराजांची भूमिका साकारली होती. ही मालिका छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित होती.

जाहिरात
0708

अभिनेता शरद केळकरने 'तान्हाजी' या हिंदी चित्रपटात छत्रपतींची भूमिका साकारली होती.

जाहिरात
0808

येत्या काळात 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या