‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्या फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे आपल्या फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
राखाडी रंगाच्या साडीमध्ये श्रेयाचं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे. चाहत्यांनी तर श्रेयाची तुलना चक्क ब्रिटीश मॉडेलशी केली आहे.
साडी नेसण्याची श्रेयाची ही काही पहिली वेळ नाही. मात्र प्रत्येक साडीमध्ये श्रेया खुपचं उठून दिसते.
आपल्या अप्रतिम विनोदाने चाहत्यांना पोट धरून हसायला लावणारी श्रेया आपल्या खाजगी आयुष्यात तितकीच स्टाईलिश आहे.
मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या श्रेयाने 'फू बाई फू ' मधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केल होतं.
मात्र श्रेयाला खरी ओळख मिळवून दिली ती 'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाने.
महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात ती एकमेव स्त्री कलाकार आहे. आत्ता जरी वेगवेगळ्या स्त्री अभिनेत्री त्यात दिसत असल्या, तरी मुख्य टीममध्ये श्रेया ही एकटीच आहे.