JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘माझी प्रतिष्ठा धुळीस मिळाली’; ही डॉक्युमेंट्री पाहून गायिका 14 दिवस रडली

‘माझी प्रतिष्ठा धुळीस मिळाली’; ही डॉक्युमेंट्री पाहून गायिका 14 दिवस रडली

जगप्रसिद्ध गायिका स्वत:च्या डॉक्युमेंट्रीवर संतापली; निर्मात्यांवर केले गंभीर आरोप

0110

जगप्रसिद्ध पॉपसिंगर ब्रिटनी स्पिअर्स सध्या संगीतसृष्टीत कार्यरत नाही. मात्र आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं ती नेहमीच चर्चेत असते. (Britney Spears/Instagram)

जाहिरात
0210

गेल्या काही काळात ती वडिलांसोबत सुरु असलेल्या आर्थिक वादामुळं चर्चेत होती. परंतु हा वाद मिटताच आता ती आणखी एका नव्या वादामुळं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. (Britney Spears/Instagram)

जाहिरात
0310

अलिकडेच फार्मिंग ब्रिटनी स्पिअर्स नावाची एक डॉक्युमेंट्री प्रदर्शित झाली. ही डॉक्युमेंट्री पाहून ब्रिटनी प्रचंड संतापली आहे. (Britney Spears/Instagram)

जाहिरात
0410

या लघुपटातील काही भाग पाहून ब्रिटनी जणू नैराश्येत गेली आहे. तब्बल 14 दिवस ती घरात रडत होती असा दावा तिनं केला आहे. (Britney Spears/Instagram)

जाहिरात
0510

तिनं या डॉक्युमेंट्रीबाबतचं आपलं मत एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केलं आहे. “लोक कायम माझ्यावर टीका करतात. अर्धवट माहितीच्या आधारावर माझ्याबाबत मतं व्यक्त केली जातात. अन् या डॉक्युमेंट्रीमध्येही तेच करण्यात आलं आहे.” (Britney Spears/Instagram)

जाहिरात
0610

ही डॉक्युमेंट्री मी अद्याप संपूर्ण पाहिलेली नाही. मात्र जितकी पाहिली त्यामध्ये माझा अपमानच करण्यात आला आहे. माझ्याबाबत चूकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा आशयाचं मत ब्रिटनीनं व्यक्त केलं. (Britney Spears/Instagram)

जाहिरात
0710

या डॉक्युमेंट्रीची निर्मिती समांथा स्टार्क हिनं केली आहे. तिनं ब्रिटनीनं केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (Britney Spears/Instagram)

जाहिरात
0810

ही डॉक्युमेंट्री तयार करण्यापूर्वी आम्ही ब्रिटनीची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिनं आम्हाला भेटण्यास नकार दिला. (Britney Spears/Instagram)

जाहिरात
0910

त्यामुळं तिच्या कुटुंबीयांकडून जी काही माहिती मिळाली. शिवाय वृत्त माध्यम आणि मुलाखतींद्वारे जी माहिती उपलब्ध झाली त्या आधारे या डॉक्युमेंट्रीची निर्मिती करण्यात आली. (Britney Spears/Instagram)

जाहिरात
1010

मात्र ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचा दावा ब्रिटनी स्पिअर्स सध्या करताना दिसत आहे. ही डॉक्युमेंट्री पाहून ती 14 दिवस रडत होती असंही म्हणाली. (Britney Spears/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या