JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्री मधुबाला यांच्या बहिणीला सुनेनं काढलं घराबाहेर, 96 व्या वर्षी झालीय ही अवस्था

अभिनेत्री मधुबाला यांच्या बहिणीला सुनेनं काढलं घराबाहेर, 96 व्या वर्षी झालीय ही अवस्था

प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood) मधुबालाची (Madhubala) मोठी बहीण कनीज बलसारा यांना वयाच्या 96 व्या वर्षी त्यांच्या सुनेनं घराबाहेर काढलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी - प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री  (Bollywood) मधुबालाची  (Madhubala) मोठी बहीण कनीज बलसारा यांना वयाच्या 96 व्या वर्षी त्यांच्या सुनेनं घराबाहेर काढलं आहे. आता त्या त्यांची मुलगी परवीज सोमजीसोबत आहेत. नुकतंच कनीज बलसारा यांना ऑकलंडमध्ये प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या आहेत. त्यांच्या सुनेने त्यांना पैसे आणि अन्नाशिवाय ऑकलंडहून मुंबईला पाठवलं होतं. एयरपोर्टवर आरटीपीसीआरसाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. परवीज आणि मधुबालाची बहीण माधुरी भूषण यांनी याबाबत मीडियाशी संवाद साधला. एयरपोर्ट अधिकाऱ्यांनी परवीजला सांगितलं कि, 96 वर्षीय कनीज बलसारा यांच्या बॅगेत न तर पैसे होते न त्यांनी काही खाल्लं होतं. आपल्या मुलीला पाहून कनीजला थोडं बरं वाटलं आणि त्यांनी पहिली गोष्ट सांगितली कि त्यांना भूक लागली आहे. त्यांना खायचं आहे. आता या प्रकरणातील एक नवीन अपडेट समोर आली आहे, परवीजने न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांना पत्र लिहून तिची आई कोणत्या परिस्थितून गेलीय, याची माहिती दिली आहे. या संपूर्ण घटनेची न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना माहिती असावी, अशी परवीजची इच्छा आहे. परवीझ यांनी ईटाइम्सशी संवाद साधताना, आपण याबाबत न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचं खरं असल्याचं म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘मला आता याबद्दल अधिक माहिती द्यायला आवडणार नाही. कनीज बलसारा ही मधुबालाची मोठी बहीण आहे. त्याचवेळी मधुर भूषण यांनीही मधुबालाबाबत मीडियाशी संवाद साधला. 14 फेब्रुवारीला मधुबाला यांची जयंती होती. मधुर भूषण यांनी मीडियाला सांगितलं होतं की, लग्नानंतरही मधुबाला का आनंदी नव्हती. मधुबालाच्या हृदयात छिद्र असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांना उपचारासाठी लंडनला जायचं होतं. पण त्यानंतर किशोर कुमार यांनी त्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला आणि लग्नानंतर दोघेही लंडनमध्ये उपचारासाठी एकत्र गेले. दरम्यान, किशोर कुमार त्यांच्या कामात आणि कामाच्या कमिटमेंटमुळे व्यग्र असल्याने मधुबाला यांचं वैवाहिक आयुष्य एकांतातच गेलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या