बॉलिवूडचे अनेक बिग बजेट चित्रपट रिलीज होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र कोरोना महामारीमुळे त्याला विलंब होत आहे. दिग्दर्शकांनी पठाण, लाल सिंग चढ्ढासारख्या चित्रपटांसाठी भरमसाठ रक्कम देऊन अभिनेत्यांना साईन केलं आहे.
बॉलिवूडचे अनेक बिग बजेट चित्रपट रिलीज होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र कोरोना महामारीमुळे त्याला विलंब होत आहे. दिग्दर्शकांनी पठाण, लाल सिंग चढ्ढासारख्या चित्रपटांसाठी भरमसाठ रक्कम देऊन अभिनेत्यांना साईन केलं आहे. आज आपण अशाच चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत.
लाल सिंह चढ्ढा- आमिर खान या चित्रपटात फक्त अभिनेताचं नाही तर निर्मात्यांपैकी एक आहे. बॉलिवूडलाईफ.कॉमच्या रिपोर्टनुसार आमिर खानची या चित्रपटाच्या नफ्यामध्ये 70 टक्के भागीदारी असणार आहे.
सत्यमेव जयते 2- हा चित्रपट 'सत्यमेव जयते' चा सिक्वल असणार आहे. यामध्ये जॉन अब्राहिम मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटासाठी त्याला 20 कोटी रुपये देऊन साईन करण्यात आलं आहे.
ब्रम्हास्त्र- या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर पहिल्यांदा एकत्र झळकणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार त्यांना 30 कोटीमध्ये साईन करण्यात आलं आहे.
पठाण- शाहरुख खान या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी त्याला 120 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
राध्ये श्याम- या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रभासने हा चित्रपट 80 कोटींमध्ये साईन केला आहे. चित्रपटाच्या एकूण नफ्यामध्ये त्याचा 10 टक्के वाटा असणार आहे.
सूर्यवंशी- या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. तो या चित्रपटाच्या इतर निर्मात्यांमधील एक आहे. चित्रपटाच्या नफ्यातील 30 टक्के वाटा त्याचा असणार आहे.
83- या बयोपिकमध्ये अभिनेता रणवीर सिंगने क्रिकेटर कपिल देवची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार त्याला या चित्रपटासाठी 50 कोटी रुपये देण्यात आले आहेत.