Valentine’s Day 2022: मनोरंजनसृष्टीतही या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे 2022 अनेक नवविवाहित जोडप्यांसाठी खास असणार.गेल्या काही महिन्यांत अनेक सेलेब्रिटी लग्नाच्याबेडीत अडकले आहेत. त्यामुळे लग्ना नंतरचा हा त्यांचा पहिलाच व्हेलेंटाईन डे असणार आहे. पाहुया या यादीत कोणकोणत्या कलाकारांचा समावेश आहे.
व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे आणि आजूबाजूला उत्साह, आशा आणि भरपूर प्रेम जाणवू लागलं आहे. बॉलिवूडमध्येही या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे 2022 अनेक नवविवाहित जोडप्यांसाठी खास असणार.गेल्या काही महिन्यांत अनेक सेलेब्रिटी लग्नाच्याबेडीत अडकले आहेत. त्यामुळे लग्ना नंतरचा हा त्यांचा पहिलाच व्हेलेंटाईन डे असणार आहे. पाहुया या यादीत कोणकोणत्या कलाकारांचा समावेश आहे.
गेल्यावर्षी 9 डिसेंबर 2021 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलने राजेशाही थाटात लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. आता हे जोडपं लग्नानंतर आपला पहिला व्हेलेंटाईन डे साजरा करताना दिसतील.
अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी जून 2021 पहिलाच व्हॅलेंटाईन डे असेल. म्हणूनच त्यांच्यासाठी हा दिवस नक्कीच खास असणार आहे.
अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी अखेर नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. अशा परिस्थितीत लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे त्यांच्यासाठी नक्कीच खास असेल अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे.
या वर्षातील सर्वात चर्चेत असलेल्या विवाहसोहळ्यांपैकी एक, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी 14 डिसेंबर रोजी राजेशाही थाटात लग्न केलं होतं. अशाप्रकारे त्यांच्यासाठीही लग्नानंतरचा हा पहिला व्हॅलेंटाईन वीक खास आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉय नुकताच आपला बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. त्यांच्यासाठीसुद्धा हा पहिला व्हेलेंटाईन वीक खास असणार हे नक्की.
बिग बॉस फेम अभिनेत्री करिश्मा तन्ना नुकताच आपला बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.त्यामुळे हा व्हेलेंटाईन डे त्यांच्यासाठी किती खास असेल हे सांगायची गरज नाही.