Kanika Kapoor: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कनिका कपूरने एक गोड पोस्टसुद्धा लिहिली आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कनिका कपूरने एक गोड पोस्टसुद्धा लिहिली आहे.
कनिका कपूरच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिने काल अर्थातच 21 मे रोजी उद्योजक गौतमसोबत लग्न केलं आहे
फोटो शेअर करत कनिकाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'आणि मी हो म्हणाले. तुमच्यासोबत परीकथा सत्यात उतरू शकतात, त्यांच्यावर विश्वास ठेवणं बंद करु नका'.
कनिकाने पुढे पोस्टमध्ये लिहिलंय, 'स्वप्न पाहा, कारण एक दिवसती खरी होतात. मला माझा राजकुमार सापडला आहे, मला माझा सहकलाकार सापडला आहे. आमच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल या जगाचे आभारी आहोत'.
कनिका म्हणते, 'मी माझा एकत्र प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहे. मला तुझ्याबरोबर म्हातारं व्हायचं आहे, तुझ्यावर प्रेम करायचं आहे आणि तुझ्याबरोबर खूप काही शिकायचं आहे, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्याबरोबर हसणं. दररोज माझ्या चेहऱ्यावर हसू आणल्याबद्दल धन्यवाद. माझा सर्वात चांगला मित्र, माझा जोडीदार आणि माझा हिरो'.
तर दुसरीकडे पती गौतमने व्हाईट ट्रॅडिशनल शेरवानी परिधान केली होती. या दोघांचा लुक नेटकऱ्यांना प्रचंड पसंत पडत आहे.