JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / फरहान-शिबानीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर, शबाना आझमींनी केला होता सुनेसोबत डान्स

फरहान-शिबानीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर, शबाना आझमींनी केला होता सुनेसोबत डान्स

लग्नाच्या फोटोंनंतर, आता शिबानी दांडेकरने तिच्या इन्स्टाग्रामवर 17 फेब्रुवारीला झालेल्या तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

019

बॉलिवूडचे नवविवाहित कपल फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर सध्या त्यांच्या लग्नामुळे चांगलेच चर्चेत आहेत. या जोडप्याने 19 फेब्रुवारी ला लग्नगाठ बांधली आहे.

जाहिरात
029

हा विवाह जावेद अख्तर यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर पार पडला. लग्नानंतर आता शिबानीने 'बोहो मेहंदी' मधून स्वतःचे आणि फरहानचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
039

लग्नाच्या फोटोंनंतर, आता शिबानी दांडेकरने तिच्या इन्स्टाग्रामवर 17 फेब्रुवारीला झालेल्या तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. या जोडप्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य मेहंदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

जाहिरात
049

शिबानी दांडेकरने तिच्या इन्स्टाग्रामवर एकूण चार पोस्ट केल्या आहेत. आणि या चार पोस्टमध्ये अनेक फोटो शेअर करत वेगवेगळे कॅप्शन लिहिले आहेत. तिच्या शिबानीने तिच्या कॅप्शनमध्ये खुलासा करत म्हटलं आहे की, तिची 'बोहो मेहंदी' पार्टी तिच्या जिवलग मैत्रिणी पायल सिंघल आणि नेहाली कोटियन यांनी होस्ट केली होती.

जाहिरात
059

फोटोमध्ये शिबानी तिच्या मित्र-मैत्रिणींमध्ये हसताना आणि धम्माल करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये, शिबानी मोकळ्या केसांमध्ये आणि न्यूड मेकअपमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
069

फोटोंमध्ये शिबानी तुफान डान्स करताना आणि मजामस्ती करताना दिसून येत आहे.

जाहिरात
079

या कार्यक्रमात शिबानीने फरहानसोबत डान्स करण्यापासून ते त्याच्या हातावर मेहंदी काढण्यापर्यंत सर्व आनंद घेतला आहे.

जाहिरात
089

या फोटोंमध्ये ती तिची 'बोहो मेहंदी' फ्लॉन्ट करताना दिसत आहे. ज्यामध्ये फक्त 'एफ' अक्षर म्हणजे फरहानच्या नावाचा पहिला शब्द लिहिलेला आहे. त्याचवेळी फरहानच्या हातात F, आणि S लिहिलेले दिसत आहेत.

जाहिरात
099

शबाना आझमींनीही सुनेसोबत डान्स केला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या