JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'संजू'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम, 2 दिवसांची कमाई...!

'संजू'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम, 2 दिवसांची कमाई...!

संजू झालेल्या रणबीर कपूरचं नशीब यंदा खळखळून उजळलं असं म्हणायला हरकत नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जुलै : संजय दत्तच्या आयुष्यावर बनलेल्या ‘संजू’ या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे हा सिनेमा अवघ्या तीन दिवसात 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमाची रिलीजपूर्वीच प्रचंड चर्चा होतीच. त्याच जोरावर पहिल्या दिवशी 34 कोटी 75 लाख रूपयांचं बंपर ओपनिंग या सिनेमाने मिळवलं. त्यामुळे फर्स्ट डे ओपनिंगच्या बाबतीत रणबीरने सलमानच्या रेस थ्रीलाही मागे टाकलं. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 38 कोटी 60 लाख रूपयांचा बिझनेस करून आपली घोडदौड कायम ठेवली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याने 73 कोटी 75 लाख रूपयांचा बिझनेस केला. तर या सिनेमाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता रविवारच्या दिवशी 40 कोटी सहज कमावून तो 100 कोटी क्लबमध्ये एंट्री घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात संजय दत्तचा बॉलिवूडमध्ये प्रवेश, त्यानंतर त्याचं ड्रग्जच्या आहारी जाणं, आणि मुख्य म्हणजे 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्म्स अॅक्ट अंतर्गत त्याने भोगलेली शिक्षा या सगळ्याचा आलेख या सिनेमात पहायला मिळतोय. या सिनेमात रणबीर कपूरसोबत मनीषा कोईराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, सोनम कपूर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. संजू झालेल्या रणबीर कपूरचं नशीब यंदा खळखळून उजळलं असं म्हणायला हरकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या