मुंबई, 22 फेब्रुवारी- राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात (Raj Kundra Pornography Case) मुंबई क्राइम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) प्रॉपर्टी सेलने मोठी कारवाई करून आणखी 4 फरार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कास्टिंग डायरेक्टर (casting director) आणि त्याच्या तीन साथीदारांचा समावेश असून, त्यांना मुंबईतल्या वर्सोवा आणि बोरिवली परिसरातून अटक करण्यात आली आहे. प्रॉपर्टी सेलच्या अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पॉर्नोग्राफी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून चार आरोपी फरार होते. आणि पथकं त्यांचा शोध घेत होती. त्याच दरम्यान, पथकाला त्यांच्या गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली, की या प्रकरणातला आरोपी कास्टिंग डायरेक्टर नरेश कुमार राममनोहर पाल वर्सोवा परिसरात येणार आहे. ही माहिती मिळताच प्रॉपर्टी सेलच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. पालच्या चौकशीदरम्यान, गुन्हे शाखेला आणखी 3 आरोपींची माहिती मिळाली. हे तिघेही या प्रकरणात त्याचे साथीदारही होते. यानंतर गुन्हे शाखेने गोरेगाव येथून सलीम गुलाब सय्यद आणि अब्दुल गुलाब सय्यद या दोन आरोपींना अटक केली. अमन बर्नवारला बोरिवली परिसरातून अटक करण्यात आली. क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, या चार आरोपींवर मॉडेल्स आणि अभिनेत्रींकडून जबरदस्तीने पॉर्न फिल्म शूट करून घेण्याचा आणि त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कास्टिंग डायरेक्टर नरेश पाल त्यांना बळजबरीने मढ भागात घेऊन जात असे आणि तेथे पॉर्न फिल्म शूट (film shooting) करण्यास भाग पाडत असे. जबरदस्तीने पॉर्न फिल्मचं शूटिंग करवून घेतल्यानंतर तो त्यांना फक्त 2000 रुपये द्यायचा आणि या कामात इतर तीन आरोपी त्याला मदत करायचे. गुन्हा दाखल झाल्यापासून हे आरोपी गोवा (goa) आणि सिमल्यात (Shimla) लपून बसले होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुंबई क्राईम ब्रँचने पॉर्नोग्राफी प्रकरणी (pornography case) आतापर्यंत एकूण 4 गुन्हे दाखल केले असून, या सर्वांच्या तपासासाठी एसआयटी तयार करण्यात आली आहे. अभिनेत्री गहना वशिष्ठ (gehna vashishth) आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती, उद्योगपती राज कुंद्रा (raj kundra) यांना गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं. राज कुंद्रा बराच काळ या प्रकरणात तुरुंगात राहिला होता. सध्या दोघेही जामिनावर बाहेर असून, गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.