JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / प्रिती झिंटाच्या आधी शाहरुख खानसह या सेलिब्रिटींनी निवडले IVF, सरोगसीद्वारे बनले आई-बाबा

प्रिती झिंटाच्या आधी शाहरुख खानसह या सेलिब्रिटींनी निवडले IVF, सरोगसीद्वारे बनले आई-बाबा

प्रीती झिंटाने काही दिवसांपूर्वी सांगितले की, ती सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली आहे. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत आपल्या मुलांची नावे सांगितली होती. येथे आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सांगत आहोत ज्यांनी पालक होण्यासाठी सरोगसीचा मार्ग निवडला होता.

0110

बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने दोन दिवसापूर्वी घोषणा केली आहे की ती जुळ्या मुलांची आई बनली आहे. एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये तिला झाली आहेत. सरोगसीच्या माध्यमातून ती आई झाली. प्रितीने सांगितले की, तिने दोन्ही मुलांची नावे जय आणि जिया ठेवली आहेत. दोन्ही बाळांच्या आगमनाने प्रितीचा संसार मोठा झाला आहे. येथे आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत जे प्रीतीपूर्वी IVS आणि सरोगसीद्वारे पालक बनले होते.

जाहिरात
0210

या यादीत सर्वात पहिला क्रमांक आमिर खानचा लागतो. 2011 मध्ये आमिर आणि किरणने IVF च्या माध्यमातून आझादचे स्वागत केले होते. आमिरने लोकांमध्ये IVF बद्दल जनजागृतीही केली.

जाहिरात
0310

2013 मध्ये शाहरुख खान आणि गौरी खानचा सर्वात छोटा मुलगा अबराम सरोगसीद्वारे जन्माला आला आहे. सोहेल खान आणि सीमा खान यांनी शाहरुखला सरोगसीची कल्पना सुचवली होती.

जाहिरात
0410

सोहेल खान आणि सीमा खान यांनी त्यांच्या पहिल्या मुलाच्या, निर्वाणाच्या जन्मानंतर दहा वर्षांनी आयव्हीएफ सरोगसीचा पर्याय निवडला. त्यांचे दुसरे अपत्य योहानचा जन्म जून २०११ मध्ये सरोगसीद्वारे झाला.

जाहिरात
0510

दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान 43 वर्षांची होती जेव्हा तिला फेब्रुवारी 2008 मध्ये सरोगसीद्वारे तीन मुले झाली. फराहने सरोगसीचे वर्णन करत हे चमत्कारिक असल्याचे सांगितले आहे.

जाहिरात
0610

दिग्दर्शक-निर्माता करण जोहर सरोगसीद्वारे यश आणि रुही या जुळ्या मुलांचा पिता झाला. फेब्रुवारी 2017 मध्ये या जुळ्या मुलांचा जन्म झाला होता.

जाहिरात
0710

सरोगसीच्या माध्यमातून तुषार कपूर मुलगा लक्ष्यचा सिंगल पॅरेंट झाला. लक्ष्यचा जन्म जून 2016 मध्ये झाला होता.

जाहिरात
0810

एकता कपूरसुद्धा सरोगेसीद्वारे सिंगल मदर बनली आहे.

जाहिरात
0910

श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती मे २०१८ मध्ये सरोगसीद्वारे पालक बनले. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव आद्या ठेवले आहे. लग्नाच्या 14 वर्षानंतर या जोडप्याने सरोगसीचा पर्याय निवडला होता.

जाहिरात
1010

शिल्पा शेट्टीने 2020 मध्ये तिच्या दुस-या मुलाच्या जन्माची घोषणा केली होती. अभिनेत्रीला 2020 मध्ये सरोगसीद्वारे समिशा नावाची मुलगी झाली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या