90च्या काळातील अनेक अभिनेते आजही चित्रपटात काम करत आहेत. मात्र अभिनेत्री फारच कमी प्रमाणात दिसून येत आहेत.
अजूनही तरुण पिढीला नव्वदच्या दशकातील अनेक गाणी पसंत पडतात. हिना, आशिकी, सिर्फ तुम यांसारख्या चित्रपटांची गाणी आजसुद्धा सुपरहिट आहेत. या काळात याचित्रपटांसोबत या अभिनेत्रीसुद्धा खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र आज त्या माध्यमांपासून दूर राहत अज्ञातवासात आपलं आयुष्य जगत आहेत. 90च्या काळातील अनेक अभिनेते आजही चित्रपटात काम करत आहेत. मात्र अभिनेत्री फारच कमी प्रमाणात दिसून येत आहेत.
1991 मध्ये सडक आणि दिल है की मानता नही चित्रपटांतून प्रेक्षकांना भुरळ पडणारी अभिनेत्री म्हणजे पूजा भट्ट होय. पूजा भट्ट आज एक निर्माती म्हणून बॉलीवूड मध्ये दिसत असली. त्री ती अभिनयापासून फार दूर गेली आहे.
90 च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट 'आशिकी' मधून आपल्या अभिनयाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे अनु अग्रवाल. या चित्रपटात तिला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र एका घटनेने अनूचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. ती हळूहळू चित्रपटसृष्टीपासून अलिप्त होतं गेली. त्यातून ती कधीच बाहेर निघू शकली नाही. तिने आपल्या एका पुस्तकात आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लिहिलं होतं.
हिना या चित्रपटातून झळकलेली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावे सुद्धा मोठी प्रसिद्धीस आली होती. मात्र त्यांनतर त्यांना हिंदी चित्रपटांत त्यांना फारसं यश लाभलं नाही. आणि त्यांनी दक्षिणात्य चित्रपटांकडे आपला मोर्चा वळविला होता.
आयेशा जुल्का या गोड अभिनेत्रीनं खिलाडी आणि जो जिता वही सिकंदर सारख्या चित्रपटांतून आपली छाप पाडली होती. मात्र तीसुद्धा परत यशाच्या शिखरावर चढू शकली नाही.
अभिनेत्री नीलम सुद्धा त्या काळात मोठ्या चर्चेत आली होती. ती सलमान खान सोबत एक लडका एक लडकी चित्रपटात झळकली होती. तसेच गोविंदा सोबत तिनं अनेक चित्रपट केले आहेत. मात्र ती काही काळातचं चित्रपटांपासून दूर झाली होती.
अभिनेत्री ममता कुलकर्णी वक्त हमारा है आणि करण अर्जुन सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र ती व्यसनाच्या आहारी गेली आणि तिच्या बॉलीवूड करिअरला खिळ बसली.
सिर्फ तुम या चित्रपटाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया गिल. प्रियानं शाहरुख खान सोबत जोश चित्रपटात सुद्धा काम केलं होतं. मात्र तिचीसुद्धा कारकीर्द खूपच कमी काळात संपली.