JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / काजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानच मिळाली होती 'Good News'

काजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानच मिळाली होती 'Good News'

बॉलीवूडमध्ये अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ज्यांना चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान आपण गरोदर असल्याची जाणीव झाली होती. त्यावेळी त्या मोठमोठ्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त होत्या.

0107

बॉलीवूडमध्ये अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ज्यांना चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान आपण गरोदर असल्याची जाणीव झाली होती. त्यावेळी त्या मोठमोठ्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त होत्या. आणि या बातमीमुळे त्यांच्या दिग्दर्शकांच्या समोर मात्र मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र या अभिनेत्रींनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली होती.

जाहिरात
0207

'वी आर फमिली' या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान अभिनेत्री काजोलला दुसऱ्या गरोदरपणाची माहिती समजली होती. यावेळी काजोलनं कोणतीही सुट्टी न घेता चित्रीकरण पूर्ण केलं. आणि त्यानंतर तिनं सुट्टी घेतली. 2010 मध्ये काजोलनं मुलगा युग याला जन्म दिला आहे.

जाहिरात
0307

'लाल सिंह चड्डा' या चित्रपटाच्या दरम्यान अभिनेत्री करीना कपूरला सुद्धा आपल्या दुसऱ्या गरोदरपणाची माहिती मिळाली होती. मात्र यावेळी कोरोनामुळे चित्रीकरण बंद होतं. मात्र चित्रीकरण सुरु होताचं करीनाने आपलं काम आधी उरकून घेतलं.

जाहिरात
0407

'देवदास' चित्रपटाच्यावेळी अभिनेत्री माधुरी दीक्षितला तिच्या गरोदर असण्याची माहिती मिळाली होती. मात्र तरीसुद्धा तिनं आपलं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. 'हम पे ए किसने हरा रंग डाला' या गाण्याच्या चित्रीकरणावेळी माधुरी दीक्षित 3 महिन्याची गरोदर होती.

जाहिरात
0507

अभिनेत्री ऐश्वर्या रॉयला जेव्हा तिच्या गरोदर असण्याची माहिती मिळाली होती, तेव्हा तिच्या हातात मधुर भांडारकर यांचा 'हिरोईन' हा चित्रपट होता. मात्र गरोदरपणाची माहिती मिळताच ऐश्वर्यानं हा चित्रपट सोडून दिला. आणि नंतर या चित्रपटात करीनाची वर्णी लागली होती.

जाहिरात
0607

जेव्हा जुही चावलाला आपल्या पहिल्या गरोदरपणाची माहिती समजली होती. तेव्हा ती एका कार्यक्रमासाठी विदेश दौऱ्यावर जाणार होती. आणि दुसऱ्या दुसऱ्या गरोदरपणाची माहिती मिळाली तेव्हा ती 'झंकार बिट्स' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती. मात्र तिने कोणतीही विश्रांती नं घेता आधी चित्रीकरण पूर्ण करून घेतलं.

जाहिरात
0707

असं म्हटलं जातं की अभिनेत्री श्रीदेवी बोनी कपूर सोबत लग्न करण्याआधीच गरोदर होती. तेव्हा ती 'जुदाई' या चित्रपटाचं चित्रीकरण करत होती.आणि बोनी कपूर हे या चित्रपटाचे निर्माता होते. मात्र तिनं विश्रांती नं घेता आधी चित्रीकरण पूर्ण करून घेतलं. चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी जान्हवी कपूर हिला जन्म दिला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या