JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / या सेलिब्रिटींनी केली होती मारामारी; पाहा भांडण करणारे बॉलिवूड कलाकार

या सेलिब्रिटींनी केली होती मारामारी; पाहा भांडण करणारे बॉलिवूड कलाकार

सलमान ते शाहरुख अन् करिश्मा ते रविना… या कलाकारांमध्ये झालं होतं कडाक्याचं भांडण

019

बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये अभिनेता किंवा अभिनेत्रींमध्ये घनिष्ठ मैत्री असल्याचं दाखवलं जातं. मात्र पडद्यामागे हे कलाकार एकमेकांसोबत शीतयुद्ध करत असतात. कित्येक वेळा तर हा वाद इतका वाढतो की हे लोक एकमेकांसोबत हातापायी करायला सुद्धा कमी करत नाहीत. आज आपण बॉलीवूडमधील असेच काही किस्से जाणून घेणार आहोत. ज्यांच्या भांडणांनी सर्वांनाच आश्चर्यचा धक्का दिला होता.

जाहिरात
029

करण जौहर कंगना रनौत- कंगना एकदा करण जौहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये पोहचली होती. त्यावेळी तिनं करणवर नेपोटीझमचा आरोप लावला होता. त्यावेळी करणनं काही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र कार्यक्रमानंतर हे दोघे एकमेकांना सतत अपमानास्पद बोलताना दिसून आले. अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर परत कंगनाने करणवर नेपोटीझमचा आरोप लावला होता.

जाहिरात
039

कंगना रनौत-महेश भट्ट- कंगना रनौतनं एका मुलाखती दरम्यान असा खुलासा केला होता. की महेश भट्टने 'वो लम्हे' चित्रपटाच्या प्रीमियरवेळी तिच्यावर चप्पल फेकून मारली होती. तिनं असंही सांगितलं होतं की, तिनं महेश भट्ट यांच्या 'धोका' या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. कारण तिला एका दहशतवादीची भूमिका करायची नव्हती. मात्र हा नकार महेश भट्ट यांना आवडला नाही. आणि तिथून हा वाद सुरु झाला.

जाहिरात
049

शाहरुख खान-शिरीष कुंदर - बॉलीवूड किंग शाहरुख खान आणि फराह खान हिचा पती शिरीष कुंदर यांच्यामध्ये सुद्धा मोठा वाद निर्माण झाला होता. एका पार्टीमध्ये शिरीषनं शाहरुखच्या रा-वन या चित्रपटाबद्दल विनोद करत म्हटलं होतं. की रा-वन हा 150 कोटींचा एक फटाका आहे. यावर शाहरुखला राग अनावर झाला होता. आणि शाहरुखनं शिरीषला एक जोरदार लगावलं होतं. त्यानंतर शाहरुख आणि फराह यांच्या मैत्रीतसुद्धा वितुष्ट निर्माण झालं होतं.

जाहिरात
059

करिश्मा कपूर-रविना टंडन- एका कार्यक्रमा दरम्यान फराह खाननं सांगितलं होतं. की 'आतिश द फायर' च्या सेटवर करिश्मा आणि रविना मध्ये जोराचं भांडण झालं होतं. हे भांडण इतकं विकोपाला गेलं होतं की दोघीही हातापायी करू लागल्या होत्या. असं सांगण्यात येतं की हे भांडण अजय देवगनसाठी झालं होतं. करिश्मा आणि रविना दोघीही अजय देवगनला पसंत करत होत्या. मात्र अजयनं राविनासाठी करिश्माला सोडलं होतं.

जाहिरात
069

करीना कपूर-बिपाशा बसू- 'अजनबी' या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान या दोघींचं कडाक्याचं भांडण झालं होतं. हे भांडण ड्रेस डिझायनर्सवरून झालं होतं. वाद इतका वाढला होता की करीनानं बिपाशाला' काली बिल्ली' असं संबोधल होतं.

जाहिरात
079

सलमान खान-ऐश्वर्या रॉय- या दोघांचं प्रेमप्रकरण बॉलीवूडमध्ये खूपच गाजलं होतं. मात्र त्यांच्या नात्याचा शेवट खुपचं वाईट झाला होता. सलमान ऐश्वर्यालासाठी खुपचं पॉझेसीव्ह झाला होता. तो तासंतास तिच्या चित्रपटाच्या सेटवर जाऊन बसत असे. जेव्हा ऐश्वर्याला वाटू लागलं की आपली प्रतिमा खराब होतं आहे. तेव्हा तिनं या नात्यातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
089

सलमान खान-शाहरुख खान- 'करण अर्जुन' या चित्रपटात एकमेकांच्या भावाचं पात्र साकारलेल्या शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात खऱ्या आयुष्यात खूप मोठा वाद निर्माण झाला होता. वाद इतका वाढला होता की दोघं एकमेकांचा चेहरा पाहणे देखील पसंत करत नव्हते. कटरीना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये शाहरुखनं सलमानची पूर्व प्रेयसी ऐश्वर्या रॉय वरून विनोद केला होता. त्यामुळे सलमान त्याचावर खूपच भडकला होता. काही वर्षानंनतर आता या दोघांत बोलणं सुरु झालं आहे.

जाहिरात
099

अरिजीतसिंह- सलमान खान- अरिजीतसिंहने एका पुरस्कार सोहळ्यामध्ये सलमान कडून पुरस्कार स्वीकारत असताना, त्याच्या चित्रपटांची खिल्ली उडविली होती. त्यावेळी सलमाननं काही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र नंतर या दोघांत शीतयुद्ध सुरु झालं होतं. हा वाद इतका वाढला होता. की सलमानच्या 'सुलतान' या चित्रपटात 'जग घुमिया' हे गाणं आधी अरिजीतनं म्हटलं होतं. मात्र वादामुळे सलमानने त्या गाण्याला नकार देतं पुन्हा ते गाणं राहत फतेह अली खान कडून गाऊन घेतलं होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या