मुंबई, 8 डिसेंबर- बॉलिवूडचे ही मॅन अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Happy Birthday Dharmendra) यांचा आज 86 वा वाढदिवस आहे. देखणं रूप, पिळदार शरीर आणि कसलेला अभिनय या बळावर तरुणींसोबतच जनमानसाच्या मनांवर गारूड करणाऱ्या धर्मेंद्र यांना आजही प्रचंड फॅन फॉलोइंग (Fan Following) आहे. अभिनेता म्हणून प्रसिद्ध असले तरीही धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्यातील काही घटनांची त्या काळात आणि आजही चर्चा होत असते.अनेक वर्षं स्टारडम अनुभवणाऱ्या धर्मेंद्र यांचं खासगी आयुष्यची (Personal Life) सर्वांना माहीत आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही त्यांनी कधी खासगी गोष्टी माध्यमांपासून लपवल्या नाहीत. धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्यातील काही किस्से आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. त्यात धर्मेंद्र-हेमामालिनी यांचं लग्न ही पण एक फिल्मी स्टोरीच आहे. धर्मेंद्रनी मोडलं होतं हेमाचं ठरलेलं लग्न- अभिनेत्री हेमामालिनी (Hema Malini) आणि अभिनेता जितेंद्र (Jitendra) यांचं लग्न होणार होतं पण धर्मेंद्र यांचं हेमावर प्रेम होतं त्यामुळे त्यांनी तिला पुन्हा विचार करायला सांगितला. हेमा आणि जितेंद्र यांचं प्रेम होतं. पण धर्मेंद्रनी फोन करून सांगितलं की जितेंद्रशी लग्न करण्याआधी एकदा मला भेट आपल्या लग्नाबद्दल फेरविचार कर. या फोनमुळे हेमामालिनी विचारात पडली त्यामुळे जितेंद्रनी तिरुपती मंदिरात जाऊन हेमाशी लग्न करण्याचं ठरवलं. असंही म्हणतात की धर्मेंद थेट विमानाने चेन्नईला हेमामालिनीच्या घरी जाऊन पोहोचले आणि हेमाला पटवलं. 1976 साली जितेंद्रने आपली गर्लफ्रेंड शोभाशी लग्न केलं. धर्मेंद्रमुळे जितेंद्र-हेमाचं लग्न मोडलं आणि हेमा व धर्मेंद्रची लव्ह स्टोरी पूर्ण झाली. लग्नासाठी बदलला धर्म- धर्मेंद्र यांचं1954 मध्ये खेड्यातल्या साध्या प्रकाश कौर या मुलीशी झाली होती. त्यानंतर धर्मेंद्र बॉलिवूड स्टार झाले. त्यांच्यावर तरुण मुली मरायच्या. त्यांच्या प्रेमाचे किस्से सगळीकडे प्रसिद्ध होते. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना चार मुलं झाली होती. धर्मेंद्र यांचं वागणं माहीत असूनही प्रकाश पंजाबमधल्या खेड्यात राहून त्यांच्यावर प्रेम करत होत्या. पण धर्मेंद्रने हेमामालिनीशी लग्न करण्याचा निर्णय त्यांना आवडला नाही आणि त्यांनी घटस्फोटाला नकार दिला होता. त्यामुळे धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी धर्मांतर करून आएशा आणि दिलावर अशी नावं धारण केली आणि मग लग्न केलं. चाहत्यांना सुरुवातीला हे माहीत नव्हतं. नंतर चाहत्यांना ते कळालं. बॉबीने केला होता हेमावर हल्ला- धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेले सनी आणि बॉबी (Bobby Deol) हे लहान असतानाच धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केलं. नवी आई हेमामालिनीवर चिडून बॉबीने तिच्यावर हल्ला केला होता. खरं तर असं सांगतात की धर्मेंद्र हे विवाहित असल्याने सुरुवातीला हेमामालिनी यांनी त्यांना फारसा भाव दिला नव्हता पण नंतर मात्र त्यांच्याशीच तिने लग्न केलं. असे आहेत धर्मेंद्र यांच्या आयुष्यातील किस्से.