विकी आणि कतरिनाच्या बाबतीत एक नवीन माहिती समोर आली आहे. ही जोडी लग्नानंतर पहिल्यांदाचा एका टीव्ही शोमध्ये एकत्र दिसणार आहेत.
कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलचे (Vicky Kaushal) लग्न झाल्यापासून चाहते या क्यूट कपलला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. कोणत्याही प्रोजेक्टमध्ये ही जोडी एकत्र दिसलेली नाही तरी देखील हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. विकी आणि कतरिनाला 'जी ले जरा' मध्ये मुख्य भूमिकेत घेतल्याची काही दिवसापूर्वी बातमी आली होती. यामुळे चाहत्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते. (फोटो साभारः Instagram @katrinakaif)
आता विकी आणि कतरिनाच्या बाबतीत एक नवीन माहिती समोर आली आहे. ही जोडी लग्नानंतर पहिल्यांदाचा एका टीव्ही शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार सूत्रांनी सांगितले के, स्टार प्लस एका शोमध्ये विकी आणि कतरिनाला एका कपलच्या रूपात आणण्यासाठी उत्सुक आहेत. (फोटो साभारः Instagram @katrinakaif)
ही माहिती जर खरी असेल तर या नवीन जोडप्याला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी खूप काळ वाट पाहावी लागणार नाही. (फोटो साभारः Instagram @katrinakaif)
हा शो कन्नड शो इशमार्ट जोडीचा रिमेक असणार आहे. विकी आणि कतरिना लग्नानंतर कामात व्यस्त आहेत. (फोटो साभारः Instagram @katrinakaif)
कतरिना सध्या सलमान कानसोबत टायगर 3 सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यानंतर ती सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत फोन भूत सिनेमात दिसणार आहे. (फोटो साभारः Instagram @katrinakaif)
विक्की कौशल 'गोविंदा नाम मेरा', 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या सिनेमात दिसणार आहे. (फोटो साभारः Instagram @katrinakaif)