आपल्या अचूक कॉमेडी अंदाजानं सर्वांना हसवून लोटपोट करणारा अभिनेता म्हणजे राजपाल यादव. हा विनोदवीर आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन आयुष्याविषयी….
आपल्या अचूक कॉमेडी अंदाजानं सर्वांना हसवून लोटपोट करणारा अभिनेता म्हणजे राजपाल यादव. हा महान विनोदवीर आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.
राजपाल यादव यांचा जन्म 16 मार्च 1971 मध्ये उत्तर प्रदेश येथे झाला आहे. लहानपणापासून त्यांना चित्रपटांची प्रचंड आवड होती. म्हणून त्यांनी सिनेमातच करिअर करायचं ठरवलं होतं.
राजपाल यादव यांनी लखनऊ मधील 'भार्तेन्दू नाट्य अकॅडमी' आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली इथून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे.
सुरुवातीला त्यांनी काही गंभीर भूमिका साकारल्या होत्या. जंगली या चित्रपटामध्ये तर त्यांनी निगेटिव पात्र साकारलं होतं.
त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या विनोदाने सर्वांना हसायला भाग पाडलं. त्यांनी प्रत्येक चित्रपटात विनोदी भूमिका साकारत बॉलिवूड मध्ये महान हास्य अभिनेत्यांमध्ये आपलं स्थान प्रस्थापित केलं आहे.
त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 2 लग्न केली आहेत. पहिल्या बायकोच्या निधनानंतर त्यांनी राधा हिच्याशी दुसर लग्न केलं आहे.
त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 2 लग्न केली आहेत. पहिल्या बायकोच्या निधनानंतर त्यांनी राधा हिच्याशी दुसर लग्न केलं आहे. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे, तर दुसऱ्या पत्नीपासून दोन मुली आहेत.
राजपाल आणि राधाची भेट कॅनडामध्ये एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान झाली होती. त्यांनतर राधा भारतात परतली आणि त्या दोघांनी लग्नं केलं.
आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी मैने दिल तुझको दिया, मुझसे शादी करोगी, मालामाल विकली, चुपके चुपके,गर्व,आण , वास्तू, हंगामा, डरना मना है यांसारख्या तब्बल 150 चित्रपटांमध्ये काम करून आपल्या विनोदाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.